मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर; एका दिवसात 32 रूग्ण तर आतापर्यंत 4 मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर; एका दिवसात 32 रूग्ण तर आतापर्यंत 4 मृत्यू

राज्यात कोरोनासह स्वाईन फ्लूचंही संकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत.

राज्यात कोरोनासह स्वाईन फ्लूचंही संकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत.

राज्यात कोरोनासह स्वाईन फ्लूचंही संकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत.

  • Published by:  Rahul Punde
अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 जुलै : राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचाही धोका वाढतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूने विळखा घातला आहे. गेल्या दिवसाची स्वाईन फ्लू रुग्णाची जी आकडेवारी समोर आलीये ती पाहून आरोग्य विभागही खडबडून जागे झाले आहे. कोरोना काळात जे निर्बंध पाळण्यात आले होते तेच निर्बंध आता हॅास्पिटलमध्ये पाळले जात असून हॅास्पिटलमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची स्वाईन फ्लूची चाचणी केली जात आहे. मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. कारण ठाणे जिल्ह्यात 24 तासात स्वाईन फ्लूचे दुप्पट रुग्ण समोर आलेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून याकरता ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्यात रुग्ण वाढ होत आहे. पण, या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी 27 जुलैला स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या 34 एवढी होती. मात्र गुरुवारी 28 जुलैला ही संख्या थेट 66 वर पोहोचली आणि आता 29 जुलैपर्यंत ठाणे जिल्हयातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदेंना मोठा झटका, आता ठाणे कोर्टात याचिका दाखल, फैसला 1 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर सर्वात जास्त शहरी भागात दिसून येतोय ग्रामीण भागात अजून स्वाईन फ्लूचा तितकासा शिरकाव झाला नाहीये ही चांगली बाब असली तरीही शहरी भागात मात्र रोज दुपट्टीने स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. यात ठाणे शहराचा नंबर पहिला असून ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे 52 रुग्ण आहेत. ठाणे शहरापाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरात 18 स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यानंतर नवी मुंबई शहरात स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आहेत तर मिरा भाईंदर शहरात नुकताच स्वाईन फ्लूने शिरकाव केला असून तिथे 2 रुग्ण आढळून आलेत. आणि 2 इतर ठिकाणी. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ठाणे महापालिका हद्दीतच 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. पण, स्वाईन फ्लूची वाढती आकडेवारी पाहता तसच मंकीपॅाक्सचा धोका लक्षात घेता नागरिकांनी स्वतः हून काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे अशा आजारांना आळा बसेल त्याचा प्रसार होणार नाही असा सल्ला आता आरोग्य विभाग देत आहे.
First published:

Tags: Eknath Shinde, Swine flu in india

पुढील बातम्या