'मी स्वत:हून EDच्या कार्यालयात जाणार, माहिती हवी असेल तर देऊन येतो'

'मी स्वत:हून EDच्या कार्यालयात जाणार, माहिती हवी असेल तर देऊन येतो'

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : 'मी स्वत:हून ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना माहिती द्यायला तयार आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण 27 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे. 'मी आयुष्यात कधी सहकारी बँकेत कधी संचालक नाही, ईडीने काय तपस करायचा तो करावा,' असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मला 1980 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत अटक झाली. त्यानंतर आता कारवाईची ही दुसरी घटना आहे. ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. एक महिना निवडणूक प्रचारसाठी मी महाराष्ट्रभर जाणार आहे. त्यामुळे या काळात मी मुंबई बाहेर असेल. जर ईडीला मला संदेश पाठवायचा असेल तर मी 27 सप्टेंबर ला स्वतः जाईल आणि ईडीचा काही पाहुणचार असेल तो देखील घेईल,' असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पवारांवरील कारवाईवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'बँक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार सूडबुद्धीने अशा प्रकारची कारवाई करत नाही. महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. त्यामुळे ज्याला राजकारण कळतं ते सांगू शकेल की राज्य सरकार असं काही करणार नाही,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

First published: September 25, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading