मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आज दहावीचा निकाल लागण्याची शक्यता, वेबसाईटवर निकाल तपासायची सोपी पद्धत जाणून घ्या

आज दहावीचा निकाल लागण्याची शक्यता, वेबसाईटवर निकाल तपासायची सोपी पद्धत जाणून घ्या

Maharashtra SSC Results 2021:दहावीचा (SSC Result 2021) आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात लागणार असे संकेत राज्य शासनाकडून (Maharashtra government) देण्यात आले होते.

    मुंबई, 15 जुलै: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2021 च्या (Maharashtra SSC Results 2021) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल, असं वृत्त समोर आलं आहे. मात्र अद्याप अधिकाऱ्यांनी निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही आहे. मात्र दहावीचा (SSC Result 2021) आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात लागणार असे संकेत राज्य शासनाकडून (Maharashtra government) देण्यात आले होते. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad) यांनीही 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार असं म्हटलं होतं. कोरोनामुळे राज्यात एसएससी बोर्डाची परीक्षा 2021 रद्द करण्यात आली होती. यावर्षी निकालासाठी राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकन असा पर्याय आणला आहे. समोर आलेल्या अन्य माहितीनुसार महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 चे निकाल 23 जुलै 2021 पर्यंत जाहीर केले जातील. मात्र अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झालेली नाही. काही वृत्तांत असं समोर आलं आहे की, दहावी आणि बारावीचे निकाल थोडे पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एसएससीचा निकाल 23 जुलैपर्यंत अपेक्षित आहे, तर बारावीच्या निकालाही उशीर होणार असून 2 ऑगस्टपर्यंत जाहीर होईल. असा तपासा तुमचा निकाल अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा. आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा. आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल. संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा. एकच नंबर! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'Most Popular' असं होणार मूल्यांकन यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Exam result, Maharashtra, Ssc board

    पुढील बातम्या