मुंबई, 8 जून : SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचंही लक्ष लागलं आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल. शिवाय 'News18 Lokmat'च्या वेबसाइटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल वेगवेगळ्या तारखा चर्चेत होत्या. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण शुक्रवारी (7 जून) अखेर एसएससी बोर्डानेच निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली.
(वाचा : MSBSHSE, Maharashtra Class HSC/12th Result 2019: रिझल्टच्या दिवशी 'असे' राहा टेन्शन फ्री)
दरम्यान, या वर्षी बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. मुलींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली. मुलांचा निकाल 82.40 टक्के तर मुलींचा निकाल 90.25 टक्के असा लागला आहे. यंदा 12 वीचा सर्वाधिक निकाल बोर्डाच्या कोकण विभागाचा लागला. कोकणचा निकाल 93. 23 टक्के तर सर्वांत कमी 82.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला.
(वाचा :SSC RESULT 2019 : निकालाआधी घालमेल होतेय? 'या' टिप्स लक्षात ठेवल्या तर नाही जाणवणार तणाव)
काय टाळा? काय करा?
तज्ज्ञ सांगतात, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन झाली आहे. पेपरमध्ये जे लिहिलंय, ते बदलता येणार नाही. त्यामुळे रिझल्टच्या आधी टेन्शन घेऊ नका. सतत रिझल्टचा विचार करत बसू नका. त्याऐवजी आयुष्यात पुढे काय करायचंय त्याची तयारी करण्यावर भर द्या. दहावी, बारावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही. रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदात राहावं. आपण ज्यामुळे खुश होतो, त्या गोष्टी कराव्यात. आवडती गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, गेम्स खेळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणं या गोष्टी कराव्यात. आवडते पदार्थही खावेत. ज्यांना योग, मेडिटेशन करायची सवय आहे, तेही करावं.
SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी