SSC Result : दहावीचा निकाल उद्या; बोर्डाच्या mahresult.nic.in या साईटबरोबरच News18 Lokmat वरही दिसणार ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. ऑनलाईन रिझल्ट download कसा करायचा?

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 06:40 PM IST

SSC Result : दहावीचा निकाल उद्या; बोर्डाच्या mahresult.nic.in या साईटबरोबरच News18 Lokmat वरही दिसणार ऑनलाईन निकाल

मुंबई, 7 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृ बेवसाईटवर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल दिसतील. त्याबरोबरच News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार आहेत. निकाल कसे पाहायचे याच्या माहितीसाठी खाली स्क्रोल करा. गेले काही दिवस दहावीच्या निकालासंदर्भात उलट सुटल बातम्या येत होत्या. बोर्डाने अधिकृतपणे कुठलीही तारीख जाहीर केली नव्हती. ती आज जाहीर केली. त्यानुसार शनिवार 8 जून रोजी दुपारी 1 नंतर ऑनलाईन पाहता येतील. विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक, नाव, आईचं नाव इत्यादी माहिती भरून निकाल उघडता येईल. बोर्डाच्या वेबसाईटबरोबरच News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल दिसणार आहेत.

निकालाची ही लिंक शनिवारी दुपारी 1 वाजल्यानंतर खुली होईल.News18Lokmat च्या वेबसाईटवर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरू शकता, त्यानंतर तुम्हाला निकाल दिसेल. तज्ज्ञ सांगतात, परीक्षेच्या निकालाचा फार विचार करण्यात अर्थ नसतो. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन झालीय. पेपरमध्ये जे लिहिलंय, ते बदलता येणार नाही. दहावी, बारावीची परीक्षा हा एवढ्या मोठ्या आयुष्याचा भाग असतो. आयुष्य नव्हे. आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांनी घडत असतं. परीक्षेतले मार्क हे काही तुमचं अख्खं आयुष्य नाही.


रिझल्टच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आनंदात रहावं. आपण ज्यामुळे खुश होतो, त्या गोष्टी कराव्यात. आवडती गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, गेम्स खेळणं, मित्र-मैत्रिणींबरोबर मोकळ्या हवेत फिरायला जाणं या गोष्टी कराव्यात. आवडते पदार्थही खावेत. ज्यांना योग, मेडिटेशन करायची सवय आहे, तेही करावं.

अपेक्षेएवढा चांगला निकाल लागला नाही, तरी निराश व्हायचं कारण नाही. दहावीची परीक्षा आयुष्यात महत्त्वाची असली, तरी ही परीक्षा म्हणजे आयुष्य नाही.

Loading...

यंदाचा बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे. बारावीचा निकालही न्यूज18 लोकमतने आपल्या साईटवर दाखवला होता. दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. याशिवाय बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरही दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल दिसू शकेल. त्यासाठी SSC बोर्डाच्या mahresult.nic.in या बेवसाईटवर जाता येईल.

माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल तुम्ही News18 Lokmat या आमच्या वेबसाईटवर थेट बघू शकता. ऑनलाईन निकाल कसे बघायचे यासाठी स्क्रोल डाऊन करून खालचा परिच्छेद पाहा. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता. यंदा दोन दिवस अगोदर बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता निकाल इथे खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल.

याशिवाय बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरही दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल दिसू शकेल. त्यासाठी HSC बोर्डाच्या mahresult.nic.in या बेवसाईटवर जाता येईल.

नाशिकमध्ये फक्त 8 टक्के पाणीसाठा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...