Home /News /maharashtra /

School Reopen: राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु आणि कुठे बंद; वाचा सविस्तर

School Reopen: राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु आणि कुठे बंद; वाचा सविस्तर

School Reopen From Today: राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. राज्यात कुठे शाळा बंद आणि सुरु ते जाणून घेऊया.

    मुंबई, 24 जानेवारी: राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होत (Maharashtra School Reopen) आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra Corona) दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी धाकधूक आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. राज्यात कुठे शाळा बंद आणि सुरु ते जाणून घेऊया या जिल्ह्यात शाळा सुरु मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते 12 वीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. जळगाव भुसावळमध्ये आजपासून ग्रामीण भागातले शाळा सुरू होत आहेत. दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु होणार आहे. सकाळी 8.30 ते 11 आणि 12 ते 3.30 सुरू राहणार आहे. थंडीचे दिवस असल्याने सकाळी शाळा उशिराने भरणार आहे. जळगाव शहरातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. जालन्यात आज इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार असून सकाळी 9 ते 12 अशी वेळ राहणार आहे. वर्ध्यात पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता शाळा भरतील. लातूर जिल्ह्यात 5 वी ते 12 वी पर्यंत च्या शाळा सुरु होणार आहेत. मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू होणार असून काहींची वेळ सकाळी 10 वाजता तर काहींची 12 वाजता आहे. नाशिकमध्ये आजपासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता 9 वी ते 12 च्या 420 शाळा सुरू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात शाळा 24 जानेवारीपासून पहिली ते 12वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त दहावी आणि बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत. या जिल्ह्यात शाळा बंद पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. आजपासून वाशिम जिल्ह्यातील शाळा उघडणार नाहीत. तर रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. सांगलीत 31 जानेवारीपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. कोविड प्रादुर्भाव लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागाकरिता पारीत करण्‍यात आलेले आदेश कायम ठेवून इयत्‍ता 1 ली ते 12 वीच्‍या शाळा आजपासून निर्बंधासह सुरु होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 9 ते 12 पर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दररोज 3 ते 4 तास शाळा सुरू राहणार आहे.  नंदुरबार जिल्ह्यात 1 ली ते 4 थी पर्यंत चे वर्ग सुरू होणार नाहीत. आजपासून 5 वी ते 12वी पर्यंत च्या शाळा  सुरू होणार आहेत.  प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय घेतला आहे. 11 ते 3 या वेळेत शाळा सुरु राहतील. प्राथमिक शाळा संदर्भात नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील वर्ग ऑनलाईन पध्दतीने सुरू राहणारेत. सोलापूर महापालिका हद्दीतील शाळा 31 तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत. 31 तारखेनंतर रिव्ह्यू मिटिंगनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तर सोलापूर ग्रामीणमधील शाळांबाबत 25 तारखेला होणार निर्णय होईल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शाळा तूर्तास तरी बंद राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळा तूर्तास एक आठवडा सुरू होणार नाहीत. नागपुरात 26 जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. काय म्हणाले आदित्य ठाकरे शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं. रिस्क घेऊन पाठवू नये. काही जिल्ह्यांनी आणखी १० दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल म्हटलं आहे. तसंच शाळा आणि पालक यांच्यावर पुढची पावलं कशी टाकायची याचा निर्णय असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune school, School

    पुढील बातम्या