जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Corona : महाराष्ट्राला दिलासा! कोरोना कमी होतोय, दिवसभरात 39 हजार रुग्ण बरे, पण....

Maharashtra Corona : महाराष्ट्राला दिलासा! कोरोना कमी होतोय, दिवसभरात 39 हजार रुग्ण बरे, पण....

राज्यात आज दिवसभरात 39 हजार 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 95.14 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : महाराष्ट्रात (Maharashtra) 15 ते 20 दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Corona Third Wave) हाहा:कार माजवला होता. खरंतर नव्या वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या दहशतीतून झाली होती. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेला ओमायक्रोन महाराष्ट्रात धडकला. पाहता-पाहता त्याने अख्खा देश व्यापून घेतला. राज्यातील मुंबई-पुणे शहरात तर नव्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीचा दररोज विस्फोट होऊ लागला. पण आता कोरोनाची ही तिसरी लाटही ओसरताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. पण तरीही धोका अद्यापही टळलेला नाही. कारण वर्धा (Wardha) सारख्या जिल्ह्यात नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी ही 600 च्या पुढे आहे. तर पुणे (Pune Corona) सारख्या जिल्ह्यातही बाधितांचा आकडा प्रचंड आहे. ही आकडेवारी पुन्हा वाढली तर धोका वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं जास्त जरुरीचं आहे. दिवसभरात 39 हजार रुग्ण बरे राज्यात आज दिवसभरात 39 हजार 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 95.14 टक्क्यांवर पोहोचलं आहे. विशेष म्हणजे राज्यात काल दिवसभरात 50 हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अशीच वाढत राहिली आणि नवी बाधितांची संख्या अशाचप्रकारे घटत राहिली तर राज्यावरील कोरोना संकट नाहीसं होईल, अशी आशा आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना संकट ओसरणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 50 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका आहे. वर्धा जिल्ह्यात दिवसभरात 691 रुग्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील आकडेवारी आजही चिंता वाढवणारी अशीच आहे. वर्ध्यात आज दिवसभरात तब्बल 691 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सध्या 3373 सक्रिय रुग्ण आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. ( भयंकर घटना! तब्बल 10 दिवस लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी बसून होती आई ) मुंबईत कोरोना कमी होतोय कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात धडकली तेव्हा मुंबई शहराला मोठी हाणी झाली. मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी प्रचंड वाढली होती. पण ज्या वेगात ही कोरोनाची लाट पुढी सरकली तेवढ्याच वेगात ही लाट खाली देखील कोसळली. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा आता खाली घरसताना दिसतोय. मुंबईत आज दिवसभरात 1160 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईत सध्या 10 हजार 797 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा 375 वर पोहोचला आहे. पुण्यात कोरोनाचे 3896 नवे रुग्ण पुणे शहरात आज दिवसभरात 3 हजार 896 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं लक्षात ठेवून प्रशासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयानंतर काल तब्बल 5410 रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण ही रुग्णसंख्या कालच्या तुलनेने आज घसरल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात