जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Corona : महाराष्ट्रात दिवसभरात 18466 नवे रुग्ण, तर 4558 जण कोरोनामुक्त

Maharashtra Corona : महाराष्ट्रात दिवसभरात 18466 नवे रुग्ण, तर 4558 जण कोरोनामुक्त

Maharashtra Corona : महाराष्ट्रात दिवसभरात 18466 नवे रुग्ण, तर 4558 जण कोरोनामुक्त

कोरोना संकट गेल्या काही महिन्यांपासून ओसरत असल्याची आशा असताना नागरिकांचा पुन्हा एकदा हिरमोड होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवड्याभरापासून कमालीची वाढ होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जानेवारी : या महाराष्ट्राने (Maharashtra) गेल्या दोन वर्षात प्रचंड यातना सोसल्या. कोरोनाने लाखो नागरिकांचा बळी घेतला. लाखो नागरिकांनी जवळची माणसं गमावली. कुणी घरातला कर्ता पुरुष, कर्ती महिला, कुणी आई, भाऊ-बहीण, आजी-आजोब, तर कुणी मित्र-मैत्रिणी अशा अनेक नात्यातील जवळच्या माणसांना गमावलं. या संकटाने प्रत्येकाला खूप छळलं. प्रत्येकाचं वैयक्तिक नुकसाण झालं. हे संकट गेल्या काही महिन्यांपासून ओसरत असल्याची आशा असताना नागरिकांचा पुन्हा एकदा हिरमोड होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आठवड्याभरापासून कमालीची वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा थेट 18 हजार 466 वर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. पण आपला लढा अद्याप संपलेला नाही. आपण नक्कीच जिंकू. या सकारात्मक विचाराने आपल्याला पुढे जायचं आहे. कारण राज्यात रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही देखील समाधानकारक आहे. राज्यात आज दिवसभरात 4 हजार 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. दुसरीकडे महाराष्ट्रात आज दिवसभरात 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे 75 नवे रुग्ण कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे. या विषाणूचं महाराष्ट्रातही थैमान सुरु आहे. राज्यात आज दिवसभरात 75 नव्या ओमायक्रोनबाधितांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या 75 रुग्णांपैकी 40 रुग्ण हे मुंबईतीलच आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यातील 9, पुण्यातील 8, पनवेल 5, कोल्हापूर आणि नागपूरचे प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांची 663 इतकी संख्या झाली आहे. हेही वाचा :  महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उद्या सकाळी नऊ वाजता भवितव्य ठरणार मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ  महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी 9 हजार 170 वर नवे रुग्ण आढळले होते. तर आज हाच आकडा 18 हजार 466 वर पोहोचला आहे. त्यापैकी मुंबई शहरातच 8063 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील कोरानाबाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत सात दिवसांपूर्वी 3671 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हाच आकडा थेट 10,860 वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना आता संसर्गाचा गुणाकार करताना दिसतोय. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या 24 तासांत 10,860 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. गेल्या 24 तासांत मुंबईत 834 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 4491 वर. गेल्या 24 तासांत दाखल झालेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांची तब्येत गंभीर असून  त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. हेही वाचा :  पुण्यात कोरोनाचा विस्फोट, थेट 1 हजार 104 नवे रुग्ण; चिंता वाढली पुण्यात दिवसभरात तब्बल 1104 नवे रुग्ण पुण्यात गेल्या 24 तासात फक्त पुण्यात तब्बल 1 हजार 104 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांचा एवढा मोठा आकडा वाढल्याने पॉझिटिव्हीटी रेट हा थेट जवळपास 18 टक्क्यांवर गेल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे शहर सर्वाधिक बाधित ठरले होते. त्यानंतर आतादेखील हे दोन मोठी शहरं मोठ्या प्रमाणात बाधित ठरताना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी मृत्यूच्या आकड्यांमध्ये सध्यातरी वाढ झालेली नाहीय. पुण्यात आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय. तर 151 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात