मुंबई, 19 जुलै : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. (Maharashtra rain update) विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे महापुराची परिस्थीती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने 108 गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार कोकणा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत imd कडून orange alert देण्यात आला आहे. मुंबई पुण्यात पावसाचा जोर ओसरला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने कोकण व विदर्भात आगामी चार दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील उर्वरित भागात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या भागातही 19 ते 22 जुलैपर्यंत पाऊस राहणार आहे. पावसाचा जोर कमी असला तरी संततधार पाऊस असण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे ही वाचा : एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का, जळगावातून मोठी बातमी
विदर्भातील 'या' भागात मुसळधार
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे. तर वर्धामध्ये फक्त आज तर अमरावती आणि अकोलामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचे संकेत नसल्याचे हवामान खात्याच्या अहवालातून दिसून येत आहे.
विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले होते. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हे ही वाचा : ठाकरेंना सर्वात मोठा झटका? शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार?
ऑरेंज अलर्ट : (19 जुलै) अकोला, अमरावती
यलो अलर्ट : (19 जुलै) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती
यलो अलर्ट : (20 जुलै) : भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Nagpur News, Rain fall, Rain flood, Rainy season nagpur, Weather update