मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यात मागच्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनापासून जोरदार कोसळायला सुरुवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Alert Maharashtra) तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले.
११ Sept, पुढचे 4,5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 11, 2022
काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता.
IMD pic.twitter.com/RLgbjJpKmZ
संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर कमी हवेचे दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. कोकण, मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून वाऱ्याची दिशा आहे. मान्सूनची नैऋत्येकडील व बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. वाचा - महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, औरंगाबाद-सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस, कोल्हापुरातही कहर, निसर्गाच्या रौद्ररुपाचे भयंकर VIDEO समोर राज्यात पावसाचं पुन्हा थैमान काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा थैमान घालायला सुरूवात केली आहे. मागच्या चार दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Weather Update) दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.