शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आता बरखास्तीकडे चालली आहे, असं सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकाराचा संसार अखेरीस अडीच वर्षात आटोपला आहे, असं मानलं जात आहे.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये घडत असलेल्या या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री त्यांची बाजू या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडणार असून त्यांच्या लाईव्हकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Uddhav thackray