मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार की नाही याबाबत बोलले. आम्ही सरकार स्थापन करताना कायदेशीरबाबींची पूर्तता करूनच केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लोकशाहीमध्ये अपेक्षित लागल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असून या देशानं संविधान आहे, कायदा आहे, नियम आहे. आम्ही जे सरकार स्थापन केलं ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसून सरकार स्थापन केलं असंही ते म्हणाले.
…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती, राजीनाम्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना टोलानिवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली, धनुष्यबाणही दिला. पॉलिटिकल आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी यावरही कोर्टाने भाष्य केलं. पॉलिटिकल आणि लेजिल्सेटिव्ह पार्टीही आम्हीच होतो. त्यांच्याकडे बहुमत नाही हे माहिती होतं, हे त्यांना माहिती होतं. सरकार अल्पमतात आलं आहे हे राज्यपाल काय सगळ्यांना माहिती होतं. नैतिकतेच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत, शिवसेना-भाजप युतीला मॅन्डेट दिलं होतं. हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. बाळासाहेबांच्या मताचा आदर केला आहे. भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढवली आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी दुसऱ्यांना सोबत घेऊन सरकार बनवलं. नैतिकता कुणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही.
आमदारांच्या अपात्रतेबाबत नवा ट्विस्ट, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची गुगलीव्हीप लागू करायला तुमच्याकडे माणसं किती आहेत. धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं, जो तुम्ही गहाण ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने बहुमताचा आदर केला आहे. विधानसभा अध्यक्ष मेरिटवर निर्णय घेतील.