जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भुकेलेल्या हत्तीनं खाण्यासाठी तोडली किचनची भिंत, व्हिडिओ व्हायरल

भुकेलेल्या हत्तीनं खाण्यासाठी तोडली किचनची भिंत, व्हिडिओ व्हायरल

भुकेलेल्या हत्तीनं खाण्यासाठी तोडली किचनची भिंत,  व्हिडिओ व्हायरल

Watch Video:भुकेलेल्या हत्तीनं (Hungry Elephant) एका महिलेच्या घरातल्या किचनची भिंत (Smashing kitchen Wall)तोडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

थायलंड, 23 जून: भुकेलेल्या हत्तीनं (Hungry Elephant) एका महिलेच्या घरातल्या किचनची भिंत (Smashing kitchen Wall)तोडली आहे. दक्षिण थायलंडच्या (southern Thailand) हुआ हिन येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. हत्तीनं किचनची भिंत तोडून शिरकाव केला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. (viral video) मध्यरात्री किचनमधून आवाज येऊ लागल्यानं राचादावन फुंगप्रसोपर्न (Rachadawan Phungprasopporn) आणि तिचा पती जागे झाले. त्यानंतर ते दोघं किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाताच दोघांना धक्कादायक चित्र दिसलं. एक हत्ती त्यांच्या किचनची भिंत तोडून आत येण्याचा प्रयत्न करत होता. ते जाईपर्यंत हत्तीनं बरीच भिंत तोडली होती. भिंत तोडून हा हत्ती खाण्याचं सामान शोधत होता. त्यानंतर भुकेलेल्या हत्तीनं तांदळानं भरलेली प्लास्टिक बॅग हिसकावली आणि ती घेऊन पसार झाला.

आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्तीनं कशी भिंत तोडून किचनमध्ये शिरकाव केला आहे. राचादावन यांनी डेली मेलला सांगताना म्हटलं की, या हत्तीला या भागात चांगलंच ओळखलं जातं. कारण हा हत्ती खूप त्रास देतो. दोन महिन्यांपूर्वीही हा हत्ती घरात घुसला होता. पण त्यावेळी त्यानं काही नुकसान केलं नव्हतं. तसंच भिंतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50,000 बात (1.17 लाख रुपये) खर्च येईल, असंही राचादावन यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात