उद्धव ठाकरेंची मालेगावात 'शिवगर्जना' सभा
ठाकरे गटाचं मालेगावात जोरदार शक्तिप्रदर्शन
मलाच कळत नाही, सभेचं वर्णन काय करायचं?
मालेगावची सभा अथांग पसरली - उद्धव ठाकरे
माझी लढाई मुख्यमंत्री होण्यासाठी नाही - ठाकरे
माझी लढाई तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी - ठाकरे
आता जिंकेपर्यंत लढायचं आहे, ठाकरेंचा निर्धार
'गद्दार, ढेकणांना चिरडायला तोफ हवी कशाला?'
उद्धव ठाकरेंनी मालेगावकरांचे मानले धन्यवाद
पक्षाचं नाव, धनुष्यबाण चोरलं - उद्धव ठाकरे
जिवाभावाची माणसं चोरू शकत नाहीत - ठाकरे
हे प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही, ठाकरेंचा टोला
''कांद्या'ला भाव मिळाला, 'कांदा' खरेदी झाली'
उद्धव ठाकरेंचा सुहास कांदेंवर हल्लाबोल
अडीच वर्षांत शेतकऱ्यांसाठी काम केलं - ठाकरे
मी काय चुकीचं करत होतो? उद्धव ठाकरेंचा सवाल
गद्दारी झाली आणि आपलं सरकार गेलं - ठाकरे
शेतकऱ्याला हमखास भाव मिळालाच पाहिजे - ठाकरे
उत्तरसभेत शेतकऱ्यांना उत्तर द्या - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या वावरात 2-2 हेलिपॅड - उद्धव ठाकरे
कृषीमंत्री अंधारात जाऊन पाहणी करतात - ठाकरे
राज्यात अवकाळीनं शेतकऱ्यांचे हाल - उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांच्या पदरी किती मदत मिळाली? - ठाकरे
गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही - उद्धव ठाकरे
'गद्दारीचा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही'
'वस्त्रोद्योग आयुक्तालयही दिल्लीला घेऊन गेले'
'उद्योग बाहेर नेतायत, मुंबईचं महत्त्व कमी करतायत'
महाराष्ट्राची अजून किती अवहेलना करणार? - ठाकरे
निवडणूक आयोगाचं गांडूळ झालं - उद्धव ठाकरे
होय, मी शिवसेना म्हणणार - उद्धव ठाकरे
शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केलीय - ठाकरे
नावाइतक्या 52 तरी जागा द्या, बावनकुळेंना चिमटा
'ठाकरेंपासून शिवसेना कोणी तोडू शकत नाही'
हिंमत असेल तर तातडीनं निवडणुका घ्या - ठाकरे
'हिंदुत्वापासून लांब गेल्याचं उदाहरण दाखवा'
तुम्ही मोदींच्या नावानं मतं मागा - उद्धव ठाकरे
आम्ही बाळासाहेबांच्या नावानं मतं मागतो - ठाकरे
भाजप मिंधेंना नेता मानून लढणार का? - ठाकरे
तुमचा एक नेता म्हणजे भारत नाही - उद्धव ठाकरे
राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व - उद्धव ठाकरे
'आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त आहोत'
'स्वा.सावरकर आमचे दैवत, अपमान पटणार नाही'
उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींनाही फटकारलं
14 वर्षं सावरकरांनी छळ सोसला - उद्धव ठाकरे
'सावरकरांचं कार्य हे येड्यागबाळ्याचं काम नव्हे'
आपली एकी फोडण्यासाठी डिवचलं जातंय - ठाकरे
देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल - उद्धव ठाकरे
ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे - ठाकरे
धनुष्य हातात घेताना रावणही उताणा पडला - ठाकरे
हे प्रेम, विश्वास, जिद्द अशीच कायम ठेवा - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणाला आता कधीही सुरवात होण्याची दाट शक्यता आहे. असं असताना मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली. त्यानंतर आज वेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत
राज्यात सत्तांतरानंतर उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच येत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेसाठी धुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येत कार्यकर्ते मालेगाव कडे रवाना झाले आहेत. मालेगावला जिल्ह्यातून 5000 कार्यकर्ते जात असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. धुळे शहरातूनही मोठ्या संख्येत शिवसैनिक हे मालेगाव कडे रवाना झाले. यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जय जय कार करण्यात आला. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदार अद्दल घडवतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळेस दादा भुसे यांच्यावर जहरी टीका करत, अद्वय हिरेचा विजय मालेगाव ग्रामीण मतदारसंघात होईल असा दावा या वेळेस शिवसैनिकांनी केला.
पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरात एका दुचाकी स्वाराचा डंपर ट्रक खाली येऊन दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल रात्री पुनावळे परिसरातील काटे वस्ती या ठिकाणी हा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. दुचाकी वरून जात असलेल्या एका तरुणांने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या दुसऱ्या तरुणाला धडक दिल्यानंतर, दुचाकी स्वार तरुण रस्त्यावर खाली पडून डंपर ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आहे.
शिर्डीतील 'महापशुधन एक्स्पो'चा समारोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाला उपस्थिती
'महाएक्स्पोसाठी राज्य सरकारच्या वतीनं शुभेच्छा'
'शेतकरी आपले मायबाप, त्यांची काळजी आहे'
आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्स्पो - एकनाथ शिंदे
'पशुधन व्यवस्थित सांभाळलं तर शेतकऱ्यांचा विकास'
'तज्ज्ञांच्या माहितीचा शेतकऱ्यांना फायदा होतो'
'लम्पीच्या आजारात तात्काळ लस उपलब्ध केली'
लम्पीमुक्त पशुधनासाठी प्रयत्न सुरू - मुख्यमंत्री
पशुधन वाढलं पाहिजे, जपलं पाहिजे - एकनाथ शिंदे
12 कोटींचा वळू मी कधीच ऐकला नव्हता - शिंदे
आधुनिक पद्धतीनं पशुधन वाढल्यास फायदा - शिंदे
शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार - मुख्यमंत्री
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स