LIVE Updates : 5 एप्रिलला राष्ट्रवादीची बैठक; निवडणुकांची रणनिती ठरणार!

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | March 31, 2023, 11:49 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 2 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    15:30 (IST)

    संभाजीनगरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
    सांस्कृतिक मंडळ मैदानावर 2 एप्रिलला होणार सभा
    महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची परवानगी
    16 अटी-शर्तींसह मविआच्या वज्रमूठ सभेला परवानगी
    उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले राहणार उपस्थित  

    12:53 (IST)

    कोल्हापूर - शिवसेना, वंचित आघाडीचा मोर्चा
    अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात पालिकेवर मोर्चा
    महापालिकेसमोर घागरी घेऊन घोषणाबाजी

    12:51 (IST)

    संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी - अजित पवार
    जनतेनं शांतता आणि संयम राखावा - अजित पवार
    'शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा'
    लोकांच्या भावना भडकवू नका - अजित पवार
    'हिंसाचारावर चुकीचं वक्तव्य करणार नाही'
    दंगल घडवणाऱ्यांना खतपाणी नको - अजितदादा
    'जातीय सलोखा ठेवून मार्ग काढावा लागेल'
    अफवांवर विश्वास ठेवू नका - अजित पवार

    12:47 (IST)

    कोल्हापूर - शिवसेना, वंचित आघाडीचा मोर्चा
    अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात पालिकेवर मोर्चा
    महापालिकेसमोर घागरी घेऊन घोषणाबाजी

    11:25 (IST)

    मुंबई - राष्ट्रवादीची 5 एप्रिलला बैठक 
    शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक 
    बैठकीत आगामी निवडणुकांवर होणार चर्चा
    आमदार, खासदार बैठकीला उपस्थित राहणार

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स