कराड तालुका
पालकमंत्री शंभुराज देसाईंना पहिला धक्का, सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादी चा झाला
कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि अॅवोकेट उदयसिंह पाटील_ उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असुन सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं २ मतानं विजय मिळवलाय
मुंबई, 20 डिसेंबर : राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी होणार असून तुमच्या गावचा सरपंच कोण हे ठरणार आहे.