आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांकडून या कार्यक्रमाचे आयोजन. वरळी कोळीवाडा येथील क्लीव्हलँड बंदर भागात मच्छीमार बांधवांच्या बोटांना ये-जा करण्यासाठी 120 मीटरचा नेव्हिगेशन स्पॅन कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे. वरळीत शिंदे आणि भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार.