Live Updates : दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | May 26, 2023, 19:55 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 6 DAYS AGO

    हाइलाइट्स

    21:12 (IST)

    सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संस्थापक वसंतराव काळेंच्या पुतळ्याला काळे समर्थकांकडून दुग्धाभिषेक घालण्यात आला. वाडीकुरोली येथे राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे समर्थकांनी अभिजीत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले आहे. वाडीकुरोली येथे अभिजीत पाटील यांनी सभे दरम्यान वसंतराव काळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले होते. त्यानंतर काळे समर्थकांनी पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून शुध्दीकरण केले. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण काळे आणि अभिजित पाटील गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.

    21:11 (IST)

    देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये हे नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीसाठी जात असत. यावेळी समुद्राच्या लाटांनी त्यांची नौका मिठबांव गजबादेवी मंदिर नजिक समुद्रात बुडाली. यामध्ये नौकेच इंजिन खडकावर आदळल्याने इंजिनाचे देखील नुकसान झाले आहे. नौकेवर असलेल्या लाईफ जॅकेटच्या सहाय्याने पंढरीनाथ सनये व मंदार सनये हे सुखरूप समुद्रकिनारी पोहोचले.  स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने बुडालेली नौका समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. नौका आणि नौकेवरील इंजिन तसेच जाळ्यांचे अडीज ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे, मत्स्य व्यवसाय विभागाने संबंधित घटनेची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी नुकसानग्रस्त मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये यांनी मागणी केली आहे.

    19:51 (IST)

     दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उज्वला चक्रदेव यांची नियुक्ती. दापोली कोकण कृषी विद्यापीठाला 50 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला कुलगुरू. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत 28 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी उज्वला चक्रदेव यांची वर्णी लागली आहे

    19:43 (IST)

    वसईच्या उमेळमान  गावात एका 50 वर्षे इसमाचा मृतदेह सापडला आहे. प्रभाकर जाधव असे यांच नाव असून कालपासून ते मिसिंग असल्याचे तक्रार वसईच्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.  आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रभाकर जाधव यांचा मृतदेह उमेळमान  खाडीमध्ये सापडला. इव्हिनिंग वॉक  करणाऱ्या लोकांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. 
    माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन विभागाच्या मदतीने हा मृतदेह ताब्यात घेतला आहे मृतदेह सध्य शव विच्छेदनासाठी  प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. नेमकी ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप प्रळू शकलं नाही शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व प्रकार समोर येईल.

    18:10 (IST)

    गेल्या पंचवीस वर्षापासून कुकडीच्या पाणी प्रश्नावर राजकारण होत आहे प्रथम बाळासाहेब खासदार बाळासाहेब विखे यांनी हा मुद्दा लावून धरला होता तेव्हापासून हे राजकारण सुरू आहे पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते नगरला पाणी देत नाहीत यावर अनेकदा नाराजी व्यक्त करत आली किंबहुना कुकडीच्या पाण्यावर अनेक वर्ष राजकारण होत, आताही पाणी सोडण्यावरून रोहित पवार आणि खासदार सुजय विखे आमने-सामने आले आहेत.

    17:55 (IST)

    बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे या संभाजीनगर वरून बीडकडे येत असताना मध्यरात्री विना नंबरच्या वाळुच्या टिप्परने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला.. विशेष म्हणजे या टिप्परला नंबरही नव्हता..ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला. यावेळी कलेक्टरांच्या गाडीने वाळुच्या टिप्पर गाडीचा पाठलाग केला पाडळसिंगी जवळच्या एका सर्व्हीस रोडवर टिप्पर चालकाने आपली गाडी घातली. रस्त्याच्या मध्यभागी गाडीमधील वाळू रस्त्यावर टाकून टिप्पर चालक तेथून पसार झाला. रस्त्यावर वाळू पडल्याने कलेक्टरांच्या गाडीला त्याचा पाठलाग करता आला नाही. थेट कलेक्टरांच्या गाडीला वाळू माफियांनी लक्ष केल्याने याची गंभीर दखल यंत्रणेने घेतली आहे.

    17:30 (IST)

    लोकसभेसाठी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पूर्वीप्रमाणेच 22 जागा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या खासदारांना निश्चित उमेदवारी देण्यात येईल असा शब्द दिला होता. त्यामुळे हिंगोली लोकसभेत उमेदवारीसाठी कोणी प्रयत्न करत असतील तर गैर नाही. आणि मला उमेदवारी जर नाही मिळाली तर त्याचे दुःख होणार नाही परंतु उमेदवारी हि निश्चित मलाच मिळेल यात काही शंका नाही. असा विश्वास हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    17:27 (IST)

    अमरावती लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस मागणार. राष्ट्रवादीकडे असलेल्या अमरावती लोकसभेवर काँग्रेस व ठाकरे गटाचा दावा. काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे तर ठाकरे गटाकडून ज.मो.अभ्यंकर व दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा. विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात माविआ आक्रमक. विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची खासदार नवनीत राणा विरोधात नाराजी. अमरावतीत लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कोणत्याही परिस्थितीत अमरावती मतदार संघ काँग्रेस मागणार.

    12:19 (IST)

    मानोरा शहराच्या शिवाजी महाराज चौकात दोन तरुणांवर चाकूनं हल्ला
    आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून दोन जणांवर चाकूनं हल्ला 
    हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी  
    भर चौकात हल्ला झाल्यानं शहरात खळबळ 
    हल्ल्यानंतर आरोपी फरार  

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स