मुंबई, 19 जानेवारी : राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतीच्या 1802 जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यासाठी लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार असून कोणत्या नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकला हे स्पष्ट होणार आहे. राज्यातील ही नगरपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीतीली घटक पक्ष तसेच भाजप यांच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीचा कल समजतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाने या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. अनेक दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीला जोर लावलाय. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात म्हणजेच त्यांच्या होमग्राउंडवर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विशेष म्हणजे राज्यातील 106 नगरपंचायतींसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 23 जागा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या 45 जागा आणि 195 ग्रामपंचायतींचा देखील आज निकाल जाहीर होणार आहे. खरंतर ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक घडामोडी घडल्या. सुप्रीम कोर्टात ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकलं नाही. पण त्याआधीच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. राज्य निवडणूक आयोगाने सर्वातआधी राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार 21 डिसेंबरला 2020 रोजी 106 नगरपंचायतींमधील 1802 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान पार पडणार होतं. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुरु असलेल्या याचिकांवर जी सुनावली झाली त्यामध्ये राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश कोर्टाकडून स्थगित करण्यात आला. तसेच ओबीसी आरक्षण असलेल्या जागांचा निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती द्या, असा आदेश कोर्टाने दिला होता. त्यामुळे कोर्टाच्या या निर्वाळाचा थेट परिणाम या निवडणुकीवर पडला. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण असलेल्या तब्बल 400 जागांवर 21 डिसेंबरला मतदान झालं नाही. त्यानंतरही ओबीसी आरक्षणाता मुद्दा चर्चेत राहिला. अखेर कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण वगळूनच उर्वरित जागांसाठी 18 जानेवारीला मतदान पार पडलं. आता या सर्व जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. ( रोज-रोज चपाती खाऊन कंटाळा आलाय? थंडीच्या दिवसात ट्राय करा या 5 प्रकारच्या भाकरी ) दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ठाणे जिल्हा 1) एकनाथ शिंदे पालकमंत्री आणि शिवसेना नेते 2) कपिल पाटील केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पालघर जिल्हा 1) एकनाथ शिंदे पालकमंत्री आणि शिवसेना नेते 2) कपिल पाटील केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते 3) राजेंद्र गावित खासदार, शिवसेना रायगड जिल्हा 1) खा.सुनील तटकरे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस 2) आ.जयंत पाटील सरचिटणीस, शे.का.प. रत्नागिरी जिल्हा 1) रामदास कदम माजी मंत्री आणि शिवसेना नेते 2) अनिल परब पालकमंत्री आणि शिवसेना नेते 3) सुनिल तटकरे खासदार आणि राष्ट्रवादी नेते 4) योगेश कदम आमदार, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा 1) नारायण राणे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते 2) विनायक राऊत खासदार, शिवसेना 3) निलेश राणे भाजप नेते 4) उदय सामंत पालकमंत्री आणि शिवसेना नेते पुणे जिल्हा 1) सुनील शेळके आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस 2) बाळा भेगडे माजी मंत्री आणि भाजप नेते 3) श्रीरंग बारणे खासदार, शिवसेना सातारा जिल्हा 1) बाळासाहेब पाटील पालकमंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) शंभुराज देसाई मंत्री आणि शिवसेना नेते 3) उदयनराजे भोसले खासदार, भाजप सांगली जिल्हा 1) रोहित आर.पाटील युवा नेता, राष्ट्रवादी काँग्रेस 2) संजयकाका पाटील खासदार, भाजप 3) विश्वजीत कदम राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते 4) गोपीचंद पडळकर आमदार आणि भाजप नेते सोलापूर जिल्हा 1) विजयसिंग मोहिते पाटील माजी मंत्री आणि भाजप नेते 2) आ.बबन शिंदे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा 1) बाळासाहेब थोरात महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते 2)मधुकर पिचड माजी मंत्री आणि भाजप नेते 3) रोहित पवार आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस 4) राम शिंदे माजी मंत्री, भाजप नाशिक जिल्हा 1) छगन भुजबळ पालकमंत्री आणि नेते,राष्ट्रवादी 2) डॉ.भारती पवार केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या 3) नरहरी झिरवाळ वि.स.उपाध्यक्ष आणि नेते,राष्ट्रवादी 4) दादा भुसे कृषिमंत्री आणि शिवसेना नेते जळगाव जिल्हा 1) एकनाथ खडसे माजी मंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) गिरीश महाजन माजी मंत्री आणि भाजप नेते 3) गुलाबराव पाटील पालकमंत्री आणि शिवसेना नेते 1) अमरिश पटेल वि.प.आमदार, भाजप 2) चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार आणि शिवसेना नेते 3) आ.कुणाल पाटील प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस 4) खा.सुभाष भामरे माजी केंद्रीय मंत्री,भाजप नंदुरबार जिल्हा 1) के.सी.पाडवी मंत्री आणि काँग्रेस नेते 2) डॉ.हिना गावित खासदार, भाजप 3) चंद्रकांत रघुवंशी शिवसेना नेते औरंगाबाद जिल्हा 1) अब्दुल सत्तार मंत्री आणि शिवसेना नेते 2) रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जालना जिल्हा 1) रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते 2) राजेश टोपे पालकमंत्री आणि नेते,राष्ट्रवादी बीड जिल्हा 1) धनंजय मुंडे पालकमंत्री आणि नेते,राष्ट्रवादी 2) पंकजा मुंडे माजी मंत्री आणि भाजप नेत्या 3) सुरेश धस आमदार, भाजप लातूर जिल्हा 1) अमित देशमुख पालकमंत्री आणि काँग्रेस नेते 2) संजय बनसोडे मंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 3) संभाजी पाटील -निलंगेकर माजी मंत्री, भाजप उस्मानाबाद जिल्हा 1) तानाजी सावंत माजी मंत्री, शिवसेना 2) राहुल मोटे माजी आमदार, राष्ट्रवादी 3) बसवराज पाटील माजी आमदार,काँग्रेस नांदेड जिल्हा 1) अशोक चव्हाण पालकमंत्री आणि काँग्रेस नेते 2) प्रताप पाटील-चिखलीकर खासदार, भाजप हिंगोली जिल्हा 1) प्रज्ञा सातव वि.प.आमदार, काँग्रेस 2) संतोष बांगर आमदार,शिवसेना 3) तानाजी मुटकुळे आमदार, भाजप परभणी जिल्हा 1) रत्नाकर गुट्टे रा.स.प.आमदार, गंगाखेड 2) सिताराम घनदाट नेते, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा 1) चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री, भाजप 2) सुनील केदार मंत्री आणि काँग्रेस नेते अमरावती जिल्हा 1) यशोमती ठाकूर पालकमंत्री आणि काँग्रेस नेत्या 2) खा.नवनीत राणा नेत्या,युवा स्वाभिमान 3) आ.रवी राणे नेते,युवा स्वाभिमान यवतमाळ जिल्हा 1) डॉ.अशोक उईके आमदार, भाजप 2) वसंत पुरके माजी मंत्री आणि काँग्रेस नेते 3) संदीप बाजोरिया माजी आमदार, राष्ट्रवादी गडचिरोली जिल्हा 1) धर्मरावबाबा अत्राम माजी मंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) अंबरिशराजे अत्राम माजी मंत्री आणि भाजप नेते 3) दीपक अत्राम आदिवासी विद्यार्थी संघटना चंद्रपूर जिल्हा 1) विजय वडेट्टीवार मंत्री आणि काँग्रेस नेते 2) सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री आणि भाजप नेते वर्धा जिल्हा 1) रामदास तडस खासदार, भाजप 2) रणजीत कांबळे आमदार, काँग्रेस भंडारा जिल्हा 1) नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 2) सुनील मेंढे खासदार, भाजप 3) डॉ.परिणय फुके भाजप नेते गोंदिया जिल्हा 1) प्रफुल्ल पटेल नेते, राष्ट्रवादी काँग्रेस 2) नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 3) राजकुमार बडोले माजी मंत्री, भाजप नेते बुलडाणा जिल्हा 1) डॉ.राजेंद्र शिंगणे पालकमंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) डॉ .संजय कुटे माजी मंत्री आणि भाजप नेते वाशिम जिल्हा 1) भावना गवळी खासदार, शिवसेना 2) राजेंद्र पाटणी आमदार, भाजप 3) आ.अमित झनक जिल्हाध्यक्ष,काँग्रेस नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये आज हिंगणा व भिवापुर या दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या असून भाजप कडून चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 5 वर्षा आधीच चित्र 1) गोंदिया जिल्हा परिषद 53 जागा काँग्रेस भाजपाची युती, अडीच वर्ष काँग्रेसचा अध्यक्ष, अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष संख्याबळ 1) कॉंग्रेस - 16 2) भाजप - 17 3) राष्ट्रवादी - 20 2) भंडारा जिल्हा परिषद 52 जागा काँगेस राष्ट्रवादीची युती, पाच वर्ष काँगेसचा अध्यक्ष संख्याबळ 1) कॉंग्रेस 20 2) राष्ट्रवादी 15 3) भाजप 12 4) सेना 1 5) अपक्ष 4 यावेळेस महाविकास आघाडी व भाजप सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले भंडारा जिल्हा नगर पंचायत निवडणूक 1) नगरपंचायत नाव - लाखनी आता सत्ता कोणाकडे होती-अडीच वर्षे काँग्रेस, अडीच वर्षे भाजपा -सदस्य संख्या - 17 -भाजप किती निवडून आलेले - 8 -सेना किती निवडून आले 00 -राष्ट्रवादी किती - 2 -काँग्रेस किती - 7 2) नगरपंचायत नाव - लाखांदुर -आता सत्ता कोणाकडे होती - भाजपा -सदस्य संख्या - 17 -भाजप किती निवडून आलेले - 11 - सेना किती निवडून आले 00 -राष्ट्रवादी किती - 1 - काँग्रेस किती - 4 - अपक्ष - 1 3) नगरपंचायत नाव - मोहाडी -आता सत्ता कोणाकडे होती - कोंग्रेस एक हाती - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 3 - सेना किती निवडून आले 00 - राष्ट्रवादी किती - 1 - काँग्रेस किती - 12 - अपक्ष - 1 गोंदिया जिल्हात 3 नगर पंचायतीच्या निवडणूक 1) नगरपंचायत नाव - देवरी -आता सत्ता कोणाकडे होती - राष्ट्रवादी काँग्रेस युती राष्ट्रवादीचा अध्यक्ष अडीच वर्ष , - तर अडीच वर्षात सत्ता परिवर्तन झालं असून भाजपाची सत्ता पुढील अडीच वर्ष राहिली - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 8 - सेना किती निवडून आले 00 - राष्ट्रवादी किती - 8 - काँग्रेस किती - 1 - अपक्ष - 1 2) नगरपंचायत नाव - सडक अर्जुनी -आता सत्ता कोणाकडे होती - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता , - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 4 - सेना किती निवडून आले 00 - राष्ट्रवादी किती - 5 - काँग्रेस किती - 3 - अपक्ष - 1 - बाहुबली पॅनल - 4 3) नगरपंचायत नाव - अर्जुनी मोरगाव -आता सत्ता कोणाकडे होती - भाजप काँग्रेसची युती काँग्रेस, अडीच वर्ष अध्यक्ष, - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 6 - सेना किती निवडून आले - 1 - राष्ट्रवादी किती - 2 - काँग्रेस किती - 6 - अपक्ष - 2 सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळशिरस, नातेपुते आणि महाळुंग नगरपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते -पाटील घराण्याचे प्राबल्य असलेल्या नगरपंचायतीवर भाजपचा वरचष्मा असला तरी प्रमुख लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्ष लढतींमध्ये त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही.निवडनूक निकालानुसार मोहिते-पाटील गट संपूर्ण शाबूत आहे का की राष्ट्रवादी गटाला धक्का देऊन वर्चस्व प्रस्थापित करणार हे स्पष्ट होणार आहे. 1) नगरपंचायत नाव :- श्रीपुर महाळुंग सदस्य संख्या :- 17 21 तारखेला उभे राहिलेले उमेदवार भाजप :-13 सेना :- 13 राष्ट्रवादी :- 13 काँग्रेस :- 13 18 तारखेला उभे असलेले उमेदवार भाजप- 04 राष्ट्रवादी- 04 काँग्रेस- 04 शिवसेना- 04 2) नगरपंचायत नाव :- नातेपुते सदस्य संख्या :- सतरा 21 तारखेला उभे राहिलेले उमेदवार भाजप :- 26 सेना :- 0 राष्ट्रवादी :- 7 काँग्रेस :- 0 रासप :-6 18 तारखेला उभे असलेले उमेदवार भाजप- 8 राष्ट्रवादी- 1 काँग्रेस- 0 शिवसेना- 0 रिपाई- 0 रासप - 2 इतर- 3) नगरपंचायत नाव … माळशिरस सदस्य संख्या 17 उमेदवार भाजप - 13 सेना - 0 राष्ट्रवादी - 12 काँग्रेस - 3
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








