मराठी बातम्या /बातम्या /nashik /

VIDEO: नाशकात नगरसेविकेच्या पतीचा राडा; थेट रुग्णालयातच घुसवली कार

VIDEO: नाशकात नगरसेविकेच्या पतीचा राडा; थेट रुग्णालयातच घुसवली कार

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज एका नगरसेविकेच्या पतीने थेट रुग्णालयातच कार घुसवल्याने एकच खळबळ उडाली.

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज एका नगरसेविकेच्या पतीने थेट रुग्णालयातच कार घुसवल्याने एकच खळबळ उडाली.

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज एका नगरसेविकेच्या पतीने थेट रुग्णालयातच कार घुसवल्याने एकच खळबळ उडाली.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 15 मे: नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) रुग्णालयात आज एक वेगळीच घटना घडल्याचं पहायला मिळालं. नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविकेच्या पतीने (Corporator husband) थेट रुग्णालयातच कार घुसवली. थेट रुग्णालयात कार घुसवल्याने रुग्णालयाच्या मुख्यद्वाराचे काचेचं गेट पूर्णत: उद्धवस्त झालं. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद (Incident caught in mobile camera) केली आहे. नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात (Bitco Hospital) भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याचे वृत्त असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

पोलिसांनी रुग्णालय बंद केले असून सध्या नागरिकांची बाहेर गर्दी झाली आहे नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत मात्र रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची इनोव्हा कार आतमध्ये नेली आणि तोडफोड केली असे सांगितले जात आहे. अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचा आरोप करत या नगरसेविकेच्या पतीने रुग्णालयात गोंधळ घातला. त्याने आपली इनोव्हा कार थेट रुग्णालयात नेत काचेचं गेट उद्वस्त केलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक रुग्णालयात दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, अचानक रुग्णालयात कार शिरल्याने तेथे उपस्थित नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.

First published:

Tags: Coronavirus, Nashik