मुंबई, 13 जून: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. नद्यांना पूर सुद्धा आल्याचं काही ठिकाणी पहायला मिळत आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची (Farmers) लगबग सुरू होते पेरणीची. अनेक ठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामाला हात लावत आहेत. मात्र, याच संदर्भात आता कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना एक आवाहन केलं आहे.
80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको
गेल्या आठ दिवसंपासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग आणि मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी आणि वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
VIDEO: पर्यटनस्थळांवर बंदी तरी धबधब्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी; तिसऱ्या लाटेला निमंत्रण?
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मार्फत करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच उत्तर महाराष्ट्र, नागपूर, मराठवाड्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत तर कुठे पावसामुळे नद्यांना पूर आल्याचंही पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.