मुंबई 10 मार्च : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी औपचारिकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर सभेत बोलताना मिथुन यांनी त्यांच्या डायलॉगनी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मिथुन यांनी यावेळी एकापाठोपाठ एक असे अनेक डायलॉग ऐकवले. या सभेतून त्यांनी सांगितले की, 'मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल.' मिथुन यांचं हे वाक्य चांगलंच चर्चेत आलं. यानंतर आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut on Mithun Chakraborty) यांनी एक ट्वीट करत मिथुन यांची अप्रत्यक्षरित्या फिरकी घेतली आहे.
नितीन राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक कोब्रा दरवाजाबाहेर बसला असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत नितीन राऊत म्हणाले, कोणीतरी म्हणत होतं की भाजपनं बंगालमध्ये डोर टू डोर निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. त्यांचं हे ट्वीट अप्रत्यक्षरित्या मिथुन चक्रवर्ती यांना टोला आहे.
कोई कह रहा था बंगाल में भाजपा ने डोर टू डोर चुनावी कैंपेन शुरु कर दिया है। pic.twitter.com/wm8501WjiT
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) March 9, 2021
बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता घालवण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे. राज्यात 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा कोलकातामध्ये झाली. या सभेच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मिथुन चक्रवर्ती यांनीही याच सभेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
तृणमुल काँग्रसचे माजी राज्यसभा खासदार असलेले मिथुन बंगालमध्ये मोठे लोकप्रिय आहेत. प्रवेशावेळी केलेल्या भाषणात मिथुन म्हणाले होते की, "जो तुमचा हक्क हिरावून घेईन आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष करू. हा दिवस माझ्यासाठी स्वप्नवत आहे. इतक्या मोठ्या नेत्यांसोबत मी स्टेजवर असेल असा मी कधीही विचार केला नव्हता. बंगालमध्ये राहणाला प्रत्येक जण बंगाली आहे. मला गरिबांसाठी काम करायचं आहे, तेच माझं स्वप्न आहे.''
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Mamata banerjee, Mithun chakraborty, Nitin raut, TMC, West bengal