मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यातील 'या' गावाने करून दाखवलं; 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारं ठरलं पहिलं गाव

राज्यातील 'या' गावाने करून दाखवलं; 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारं ठरलं पहिलं गाव

Chichkheda village complete vaccination: राज्यातील चिचखेडा या गावाने लसीकरण पूर्ण केलं आहे. या गावातील सर्व 45+ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

अमरावती, 13 मे: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा (Covid Vaccine) तुटवडा जाणवत असल्याचं पहायला मिळत आहे. तसेच नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याच दरम्यान राज्यातील एका गावाने (Maharashtra village) आपल्या सर्व 45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण (Vaccination complete) करून दाखवलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) मेळघाट (Melghat) हा अशिक्षित आणि अतिदुर्गम भाग समजला जातो. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासी लोकांमध्ये अशिक्षितपणा दिसून येतो. कोरोना काळात तर मेळघाटातील आदिवासी नागरिकांनी लसीकरणाला पाठ फिरविल्याच चित्र आहे. मेळघाटातील जास्तीत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे या करिता त्याच्या कोरकू भाषेत जनजागृती करण्यात येत आहे. या सर्व बाबींना अपवाद ठरलं ते म्हणजे चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा गाव (Chichkheda village).

वाचा: हायकोर्टाने पोलखोल केल्यानंतर पुणे पालिका वठणीवर, कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली!

604 लोकसंख्या असलेल चिचखेडा गाव आहे. या गावात 45 वर्षांवरील 136 स्त्री पुरुष राहतात. या सर्वांनी अफवांना बळी न पडता स्वतःच लसीकरण करून घेतलं आहे. त्यामुळे 45 वर्षांवरील लसीकरण करणार चिचखेडा हे गाव जिल्ह्यात पहिलं गाव ठरलं (Chichkheda is first village to complete vaccination in Amravati)  आहे. याकरिता येथी तलाठी, पोलीस पाटीलसह सर्व प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन केले आहे.

सद्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविले आहे. शासनाच्या आदेशानुसार लसीकरण सुरू झाल्यास चिचखेडा गावातील 18 ते 45 वयोगटातील सर्वांचे लसीकरण होणार गाव ठरणार असा मानस देखील गावकऱ्यांनी केला आहे.

First published:

Tags: Amravati, Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani