जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा', शरद पवारांनी घातली साद

'जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा', शरद पवारांनी घातली साद

'जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा', शरद पवारांनी घातली साद

शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर इथं अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    पुणे, 8 एप्रिल : जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर इथं अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मोदींच्या सभेचा फायदाच’ ‘गेल्या विधानसभेला नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली आणि अजित दादा 1 लाख मतांनी निवडून आले. त्याआधी ते 60 ते 65 हजारांनी निवडून यायचे. आतादेखील नरेंद्र मोदी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मला चिंता नाही. उलट आता आमचा उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून येणार,’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या संभाव्य बारामती दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. VIDEO : ‘तुम्ही 1 लाख मतांनी पराभूत होणार’, चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीवर उदयनराजे म्हणतात…

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात