मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काँग्रेसनं ठरवलं, विधान परिषदेवर 'या' व्यक्तीची वर्णी, सूत्रांनी सांगितलं नाव

काँग्रेसनं ठरवलं, विधान परिषदेवर 'या' व्यक्तीची वर्णी, सूत्रांनी सांगितलं नाव

जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे.  काँग्रेसनं विधान परिषदेवर कोण पाठवणार आहे त्याचं नाव निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. काँग्रेसनं विधान परिषदेवर कोण पाठवणार आहे त्याचं नाव निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. काँग्रेसनं विधान परिषदेवर कोण पाठवणार आहे त्याचं नाव निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर: काँग्रेस विधानपरिषदेवर (Congress) दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना पाठवणार असल्याची बातमी समोर येतेय. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शरद रणपिसे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झालीय, त्याच जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रज्ञा सातव यांच्या जागेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचंही समजतंय. जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे. दुसरीकडे या जागेसाठी जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा आहे.

हेही वाचा- पॅराशूट रायडिंग करताना जोडप्याचा तुटला दोरखंड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. राज्यसभेचे खासदार असताना राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं. त्यानंतर राजीव सातव यांच्या जागी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं.

तर राज्यात शरद रणपिसेंचं निधन झालं. त्यानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या दोन जागांपैकी एका जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. त्याआधी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाईल अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांची राजकीय कारकिर्द पाहता त्यांना काँग्रेसनं विधान परिषदवर भर दिला.

प्रज्ञा सातव सक्रिय

राजीव सातव यांचं निधन झाल्यावर प्रज्ञा सातव आपल्या मुलाला घेऊन काही महिन्यातच गांधी कुटुंबियांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी मुलाचा नुकताच निकाल लागला होत. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधींची प्रत्यक्ष भेट घेतली होती. गांधी कुटुंबियांनीही सातव यांच्या मुलाचं कौतूक केलं.

हेही वाचा- T20 World Cup: ऑस्ट्रेलियन कॅप्टनची वॉर्नरबद्दलची भविष्यवाणी खरी, 2 महिन्यांपूर्वी म्हणाला होता... 

त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती. सध्या प्रज्ञा सातव काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातही सहभागी होत असतात. हिंगोली- कळमनुरीत त्या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते किंवा महिलांच्या विविध कार्यक्रमांना त्या हजेरी लावत असतात.

First published:

Tags: Rajiv Satav, काँग्रेस