नांदेड, 10 नोव्हेंबर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही सध्या महाराष्ट्रातून जात आहे. त्यांच्या या यात्रेला राज्यातून मोठ्या प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेडमध्येही राहुल गांधींना पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांना राहुल गांधींना भेटायचं आहे, त्यांच्यासोबत हस्तांदोलन करायचं आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी सर्वसामान्य लोकांना भेटत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना भेटलेल्या सर्वेश हातने या मुलाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, आजपर्यंत त्याने संगणक पाहिला नाही, हे सांगितले होते. भाषणादरम्यान राहुल गांधींनी याचा उल्लेख केला. त्याची काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दखल घेतली. यानंतर सर्वेशला आज सकाळी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संगणक भेट दिला.
Congress President Shri @Kharge, in the presence of Shri @RahulGandhi handed over a PC to Sarvesh Hatne, a young tech enthusiast & Padyatri. A little gesture from our end to help him discover more.#BharatJodoYatra pic.twitter.com/tplCJxLIKf
— Congress (@INCIndia) November 11, 2022
काल दोन मुलांनी राहुल गांधी यांना भेटल्यावर सांगितलं की त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे आहे. मात्र, त्यांनी कधीच कॉम्प्युटरही नाही पाहिलं. तसेच त्यांच्या शाळेतही कॉम्प्युटर नसल्याचे सांगितले. जर शाळेत संगणक नसेल तर त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे नाहीये आणि हे लक्षात घेऊन आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्या मुलाला संगणक दिला.
कल सपना दिखाया आज पूरा कर दिया pic.twitter.com/iSQPr20v4A
— Congress (@INCIndia) November 11, 2022
आता हा तर एकाच मुलाचा प्रश्न झाला. मात्र, आम्हाला भारतातील प्रत्येक मुलाच्या स्वप्ने पूर्ण करायचाय. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ‘तंत्रज्ञान सक्षमीकरण’चे स्वप्न या देशातील प्रत्येक मुलाने पूर्ण करावे, अशी आमची इच्छा आहे. पण भाजप सरकारच्या अपयशामुळे कोरोनाच्या काळात संगणक नसल्यामुळे लाखो मुले ऑनलाइन शिक्षणापासून कशी वंचित राहिली हे आपल्याला माहीत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.