Maharashtra Election Results 2021 Live : 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा, थोरातांचा दावा
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (gram panchayat election result 2021) आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तेची समिकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतमोजणीचे क्षणक्षणाचे अपडेट्स....
Lokmat.news18.com | January 18, 2021, 10:14 PM IST
Last Updated January 18, 2021
auto-refresh
Highlights
10:14 pm (IST)
'सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ'
कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळं
बसवराज बोमई यांनी केलं वादग्रस्त विधान
सीमाप्रश्नी आमची बाजू यापूर्वीच सिद्ध -बोमई
'सोलापूर, सांगलीत मोठ्या संख्येनं कन्नड भाषिक'
बोमईंच्या विधानावर महाराष्ट्र सरकार काय प्रतिक्रिया देणार?
9:32 pm (IST)
जलयुक्त शिवार योजनेची होणार खुली चौकशी, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमारांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती गठित
9:31 pm (IST)
ग्रा.पं. निवडणुकीची मतमोजणी शांततेत संपन्न
किरकोळ घटनांचा अपवाद वगळता पडली पार
भाजप आणि मविआकडून विजयाचे दावे-प्रतिदावे
8:05 pm (IST)
नागपुरातील संतापजनक, धक्कादायक घटना
भोंदूबाबाचा 17 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं अत्याचार
कुटुंबातील 3 महिला नातेवाईकांवरही अत्याचार
पारडी पोलिसांकडून या भोंदूबाबाला अटक
7:51 pm (IST)
माहीम बीच लवकरच नवीन स्वरूपात पाहायला मिळणार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंकडून माहीम बीचची पाहणी
7:48 pm (IST)
पुण्यात ग्रा.पं.वरून राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे
518 ग्रामपंचायती जिंकल्याचा राष्ट्रवादीचा दावा
200 ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपचा दावा
आमच्या ग्रामपंचायती राखल्या -शिवसेना, काँग्रेस
राजकीय पक्षांच्या दाव्या-प्रतिदाव्यांची बेरीज जुळेना
7:30 pm (IST)
राज्यात दिवसभरात 1,924 नवीन रुग्ण
राज्यात 3,854 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.86%
राज्यात सध्या 50,680 अॅक्टिव्ह रुग्ण
7:01 pm (IST)
नाशिक - बर्ड फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रातून कुक्कुटपालन क्षेत्राशी संबंधित म्हणजेच जिवंत कुक्कुट पक्षी, अंड्यांवर नाशिक जिल्ह्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
6:54 pm (IST)
पाचवी ते आठवीच्या शाळांबाबत मोठी बातमी
'राज्यातील शाळा 27 जाने.पासून सुरू होणार'
'राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग भरणार'
शाळा सुरू करण्याबाबत शासकीय आदेश
6:51 pm (IST)
'औरंगाबाद जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत यश'
'शिवसेना, महाविकास आघाडीला चांगलं यश'
अंबादास दानवेंचा 80% यश मिळाल्याचा दावा
'सिल्लोड, पैठण तालुक्यात शिवसेनेची बाजी'
'सिल्लोडमध्ये 83 पैकी शिवसेनेला 55 जागा'
शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी केला दावा
पैठणमध्ये 77 पैकी 65 जागा मिळतील -भुमरे
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तेची समिकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतमोजणीचे क्षणक्षणाचे अपडेट्स....