जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Corona : कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे होस्टेल बंद करण्याचा निर्णय

Maharashtra Corona : कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे होस्टेल बंद करण्याचा निर्णय

Maharashtra Corona : कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे होस्टेल बंद करण्याचा निर्णय

“सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांशी निगडीत वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना आणि कालावधी देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा (Maharashtra Corona Cases) प्रचंड वाढताना दिसतोय. त्यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्व वसतिगृह (Students Hostels) बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वसतिगृहाची व्यवस्था असेल कारण ते सध्या त्यांच्या मायदेशी परतणे अवघड आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी देखील घोषणा केली. “सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांशी निगडीत वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना आणि कालावधी देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी परदेशातून आले आहेत त्यांचे वसतिगृहाची सुरक्षा बंद करु नये. सर्व काळजी करुन त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. कारण ते सध्या त्यांच्या देशात परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुरता वसतिगृह सुरु ठेवले आहेत”, असं उदय सामंत म्हणाले. ‘परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात’ उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशीदेखील सूचना केली आहे. “फक्त कोंडवाला, जळगाव आणि नांदेड अशा विद्यापीठ अशा काही ठिकाणी कनेक्टिवीटीचा प्रोब्लेम आहे. तो तुरळक प्रोब्लेम आहे. पण अशा ठिकाणी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्या परीक्षा ऑफलाईन कशापद्धतीने घेता येतील या संदर्भात कुलगुरुंनी चर्चा केली पाहिजे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत. पण बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याचं मान्य केलेलं असल्यामुळे तो देखील निर्णय आज आम्ही जाहीर करतोय”, असं उदय सामंत म्हणाले. हेही वाचा :  राज्यातील ‘हे’ कॉलेजेस येत्या 15 फ्रेब्रुवारीपर्यंत राहणार बंद; उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय “परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या असंख्या अडचणी, आणि शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक हेल्पलाईन उघडली पाहिजे. विद्यापीठाने देखील हेल्पलाईन उघडली पाहिजे, अशी सूचना आम्ही करतोय. परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी परीक्षेचं अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इत्यादी माहिती उपलब्ध करुन द्यायची आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचंदेखील निरसन व्हायला पाहिजे”, असं उदय सामंत म्हणाले. ‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कसाठी चित्रकला स्पर्धा ऑनलाईन घेणार’ “शालेय शिक्षणाच्या काही परीक्षा उच्च व शिक्षण विभाग घेतं. त्यामध्ये दहावीच्या अगोदरच्या चित्रकला परीक्षा असतात. त्या परीक्षा पास झाल्यानंतर ग्रेस मार्क मिळतात. त्या परीक्षांबाबतही शंका निर्माण केली जात होती. पण या परीक्षादेखील फेब्रुवारीच्या अगोदर झाल्या पाहिजेत जेणेकरुन दहावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कसाठी कुठेही अडचण येता कामा नये. ते ग्रेसमार्क मिळाले नाही म्हणून आपण कुठे कमी पडलो, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात येऊ नये या परीक्षा घेतल्या जात आहेत”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. लसीकरणावर भर देण्याची सूचना “विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नसेल तर त्याचा डेटा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच लसीकरणासाठी कॅप्मचं आयोजन केलं जावं. पॉलिटेक्निकमध्ये 15 ते 18 अशा वयोगटातील विद्यार्थी असल्याने त्यांचं लसीकरण झालंय की नाही याबाबत प्रचार्यांनी चौकशी करावी. त्यानंतर कॅम्प लावून त्यांचं लसीकरण केलं जावं”, असं देखील उदय सामंत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात