जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Flood: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

Maharashtra Flood: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

Maharashtra Flood: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 30 जुलै : कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. या महापुराचा फटका रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसला. या पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, विरोधी पक्ष नेते दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. सांगलीतील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी आलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती (stay on electricity bill collection in flood hit area) देण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं, पूरग्रस्त भागात वीज बिल वसूल करू नका, परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिले भरणेसाठी सवलत दिली जाईल. यासोबतच वीज बिल माफी संदर्भात त्यांनी म्हटलं, वीज बिल माफीचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करेल. पुण्यातील डीसीपींची ऑडिओ क्लिप VIRAL, फुकट बिर्याणी प्रकरणी गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. होतं नव्हतं ते सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. यामुळे आधिच संकटात सापडलेल्या नागरिकांना आणखी वीज बिल भरण्याचा डोक्याला ताप नको म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुका, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला. या महापुरात महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणांचे सुद्धा आतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात