Home /News /maharashtra /

राज्यावर घोंघावतंय डेल्टा प्लस व्हेरिएंटचं वादळ, तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

राज्यावर घोंघावतंय डेल्टा प्लस व्हेरिएंटचं वादळ, तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रासमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)आता डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta-Plus Variant) सात प्रकरणे (seven cases)आढळून आली आहे.

    मुंबई, 20 जून: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रासमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)आता डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta-Plus Variant) सात प्रकरणे (seven cases)आढळून आली आहे. राज्यातून रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर (Ratnagiri, Navi Mumbai and Palghar)येथून काही नमूने गोळा करण्यात आले होते. त्यानंतर या व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आले. राज्यात तिसऱ्या (Third Wave) लाटेसह डेल्टा प्लस व्हेरिएंट कारण ठरण्याची शक्यता वर्तवली असून तज्त्रांनी राज्याला एकप्रकारचा सावध इशारा दिला आहे. हा व्हेरिएंटमुळे रुग्णांचा आकडा तब्बल 8 लाखांपर्यंत जाण्याची भीती आहे. तसंच त्यात 10 टक्के मुलांचा समावेश असू शकतो, असं हिंदुस्तान टाइम्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला. त्यानंतर आम्ही आणखी नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र त्याचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे, असं वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) चे संचालक डॉ. टीपी लहाने यांनी सांगितले. हेही वाचा- पेट्रोलपंपावरील वाद आमदार वैभव नाईक यांच्या अंगाशी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगली यासारख्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण तसंच पॉझिटिव्हीटी रेटही जास्त आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आलेल्या 7 रुग्णांपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरीतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 13.7 आहे. सिव्हिल सर्जन डॉ. संगमित्र गावडे यांनी सांगितले की, रत्नागिरीत आम्ही तात्काळ कंटेन्टमेंट झोन तयार केले असून काही गाव सील केली. तसंच संक्रमित दोन रुग्णांना कोणतीही लक्षणं नव्हती. तिसऱ्या लाटेचा धोका कायम राज्यात तिसऱ्या (Coronavirus third wave) लाटेचा धोका असल्याचं बोललं जात आहे. राज्यानं नियुक्त केलेल्या टास्क फोर्सनं बुधवारी सांगितलं. कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी लाट (Third Wave)राज्यात येण्याची भीती असल्याचं मत टास्क फोर्सनं ( Task Force)व्यक्त केलं. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं (Maharashtra Government) आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिल्या. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट डेल्टा प्लस (Delta plus) हा राज्यात तिसऱ्या लाटेत शिरकाव करण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Maharashtra

    पुढील बातम्या