• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Covishield कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार पण...; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Covishield कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार पण...; मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोरोना लसीकरणात पुन्हा बदल. (Image credit/pexels-nataliya-vaitkevich)

कोरोना लसीकरणात पुन्हा बदल. (Image credit/pexels-nataliya-vaitkevich)

कोविशिल्ड (Covishield) या कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर आता पुन्हा बदलणार.

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : देशात कोरोना लशीच्या (Corona vaccine) दोन डोसमधील अंतर (Gap between corona vaccine doses) आता पुन्हा बदलणार आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर जवळपास तीन महिने तुम्हाला आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण कोविशिल्ड (Covishield)  या कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर आता पुन्हा कमी केलं जाणार आहे (Corona vaccination) . कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत सरकारने विचार केला आहे. याबाबत NTAGI सोबत सविस्तर चर्चा केली जाईल, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या देशात दिल्या जाणाऱ्या इतर लशींच्या तुलनेत  पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमध्ये सर्वात जास्त गॅप आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या 12 ते 16 आठवडे आहे. आरोग्य क्षेत्रात काम इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (IAPSM)  या संस्थेने केंद्र सरकारला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. तसंच संस्थेने एकदा कोरोना संसर्ग झालेल्यांना लस न देण्याचाही सल्ला दिला. कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस का? जेव्हा कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून जास्तीत जास्त 16 आठवडे करण्यात आलं, तेव्हा देशात लशीचा तुटवडा होता. आता देशात सहा कंपन्यांच्या लशींना परवानगी मिळाली आहे. दोन डोसमधील अंतर कमी झालं तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होईल आणि कोरोना रुग्णांना गंभीर होण्यापासून किंवा रुग्णालयात दाखल होण्यापासून दूर ठेवता येईल. हे वाचा -  बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार ज्या लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना एक डोस घेतलेल्यांच्या तुलनेत संसर्गाचा धोका कमी असतो, असं दिसून आलं आहे. त्यामुळे दोन डोसमधील अंतर कमी केल्याने लोकांना कमी कालावधीत दोन्ही डोस मिळतील, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल, असं संस्थेने सांगितलं. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आता दोन डोसमधील अंतराबाबत विचार करण्याची गरज आहे, असं या संस्थेने सांगितलं. का वाढवण्यात आलं होतं कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर? कोरोना लसीकरण सुरू झालं तेव्हा कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंंतर 4 ते 6 आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून 4 ते 8 आठवडे आणि पुन्हा 12 ते 18 आठवडे  करण्यात आलं. हे अंतर वाढवण्यावरून वादही झाला होता. लसीकरणाबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. पण आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला.  या लशीच्या दोन डोसमधील अंतर जास्त असल्यास शरीरात जास्त अँटिबॉडीज तयार होतात, असं या संशोधनात दिसून आलं होतं. लशीचे चांगले परिणाम मिळावेत म्हणून भारतातही दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं. हे वाचा - ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण, 'या' मुलांना असेल प्राधान्य जूनमध्ये जेव्हा भारतात दोन डोसमधील अंतर वाढवलं गेलं तेव्हा पहिल्या डोसमुळे जास्त अँटिबॉडी दिसून आल्या आणि त्यानंतर त्या घटत गेल्याचं दिसून आलं. दोन डोसमधील अंतर घटल्यानंतर असं अनेक देशांमध्ये दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते, लसीकरणाची स्थिती बदलणार आहे आणि नव्या अभ्यानुसार यामध्ये बदल होत येणार.
    Published by:Priya Lad
    First published: