Home /News /maharashtra /

राज्यात मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

राज्यात मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज राज्यातल्या Coronavirus साथीच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

    मुंबई, 18 ऑगस्ट : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज राज्यातल्या Coronavirus साथीच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. Covid साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम सणांबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्याचं टोपे यांनी सांगितलं. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कमी करावेत आणि उत्सव साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं. धार्मिक स्थळ खुली करा, अशी मागणी वारंवार होत आहे. त्यावर ती कधी उघडतील याचा थेट खुलासा न करता टोपेंनी यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं सांगितलं. शॉपिंग मॉल उघडता तर मंदिरं का नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची जोरदार मागणी कालच केली. त्यातच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही मशिदी उघडण्याचा निर्णय होईल, असं सूतोवाच केलं होतं. धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी सरकारवर असा दबाव वाढत असताना आरोग्यमंत्र्यांनी मात्र मशिदी, मंदिरं उघडणार कधी हे थेटपणे सांगितलं नाही. "याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील", असं ते म्हणाले. जिम, धार्मिक स्थळांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. "मोठी धार्मिक स्थळं उघडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो", असंही ते म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे आगमन आणि विसर्जन मिरवणुका टाळा मिरवणुकीवर मर्यादा असाव्यात अशी पोलिसांची सूचना मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटेशन केलं पाहिजे गणेशोत्सवात सर्वांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक सामाजिक उद्देशानं गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावर भर द्यावा राज्यातला रिकव्हरी रेट वाढल्यानं दिलासा स्पेशलिस्ट डॉक्टरांची कमतरता जाणवते
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या