Live Updates: बीडमध्ये उद्यापासून 3 हजार 685 शाळा होणार सुरू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 30, 2021, 23:30 IST
  LAST UPDATED 10 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:23 (IST)

  पुणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुढील आदेशापर्यंत बंद, मावळमधील शाळादेखील पुढील आदेशापर्यंत राहणार बंद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

  21:0 (IST)

  ओमायक्रॉन व्हेरियंटनं वाढवली जगाची चिंता
  बंदी घातलेल्या देशातून लोक परतल्यानं राज्य अलर्टवर
  'तूर्तास देशात ओमायक्रॉनचा अजून एकही रुग्ण नाही'
  केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती

  20:57 (IST)

  प.बंगालच्या मुख्यमंत्री 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
  ममता बॅनर्जींनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
  ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे, संजय राऊतांची भेट
  मुंबईच्या 'ट्रायडंट'मध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा
  ममता बॅनर्जी उद्या घेणार शरद पवारांची भेट
  'सिल्व्हर ओक'वर उद्या दु.3.15 वाजता भेटणार

  20:42 (IST)

  ठाणे शहरातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार - महापौर नरेश म्हस्के

  20:41 (IST)
  पुणे - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
   
  20:39 (IST)

  ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील शाळा या 15 डिसेंबरपासून सुरू होणार - महापौर नरेश म्हस्के

  19:47 (IST)

  ठाणेकर आणि ठाणे महापालिकेला मोठा दिलासा
  दक्षिण आफ्रिकेतून 7 जण आले होते ठाण्यात
  दोघांना 14 दिवसांपेक्षा जास्त दिवस, धोका टळला
  पाचही जणांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

  19:38 (IST)

  मुंबई - भाजलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये दिरंगाई प्रकरणी खात्यांतर्गत चौकशीचे आदेश, उपअधिष्ठाता करणार चौकशी, नायर रुग्णालय प्रशासनाकडून 'त्या' चित्रफितीची दखल

  19:18 (IST)

  नवी मुंबईत आफ्रिकेतून 2 दिवसांत 20 प्रवासी आलेत
  मनपाकडून सर्वांचं स्क्रीनिंग, होम क्वारंटाईन केलं
  सध्या 20 जणांचे आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह
  7 दिवसांनंतर परत आरटीपीसीआर करण्यात येणार

  18:39 (IST)

  'अंगणवाडी सेविकांचं कोरोनायोद्धा म्हणून मोठं योगदान'
  शासनाकडून याची नोंद - उपमुख्यमंत्री अजित पवार
  'तुटपुंजे मानधन मिळायचं तरीही त्या काम करत राहिल्या'
  'आदर्श पुरस्कार मिळणाऱ्या सर्व सेविकांचं अभिनंदन'
  महिला बालकल्याणतर्फे 45 अंगणवाडी सेविकांना पुरस्कार
  पुरस्कारानं तुमच्या कामाचा हुरूप वाढतोय - अजित पवार
  यापुढेही चांगलं काम करत राहावं - अजित पवार
  आताही नव्या व्हेरियंटचा धोका संभवतोय - अजित पवार
  'अंगणवाडी सेविकांनी मास्क वापरासाठी पुढाकार घ्यावा'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स