LIVE: 'दिल्लीत जबरदस्तीने आलो; माझी बिलकुल इच्छा नव्हती' - नितीन गडकरी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 29, 2021, 21:29 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:58 (IST)

  शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांना मनसेचा दणका
  नवोदित अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी
  ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रकार उघड केला
  4 आरोपींवर पोलिसांकडून अटकेची कारवाई

  21:50 (IST)

  मंत्री दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यानं हजर राहायलाच हवं, मंत्री हे फिरण्यासाठी जात नाहीत - नारायण राणे

  21:31 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
  शिरोळसह शहरातील पूरस्थितीची करणार पाहणी
  उद्धव ठाकरे प्रशासनासोबत घेणार आढावा बैठक

  20:57 (IST)

  ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटलांवर अँजिओग्राफी
  राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज
  रिपोर्ट नॉर्मल, काळजीचं कारण नाही - जयंत पाटील
  डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला - जयंत पाटील

  20:11 (IST)

  'पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्य'
  'योजनेच्या प्रारूपावर सूचना, हरकती मागवणार'
  'लोकांना राहण्यायोग्य महानगर विकसित करा'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बैठकीत निर्देश

  20:11 (IST)

  पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांचा विमा
  'विम्याची किमान 50% रक्कम तातडीनं मिळावी'
  विमा कंपन्यांना निर्देश देण्याची विनंती
  मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

  19:41 (IST)

  नाशिक - गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस
  प्रति सेकंद 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
  धरणातील पाणी नाशिक शहरातील नदीपात्रात
  रामकुंड भरलं, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी
  छोट्या मंदिरांच्या गाभाऱ्यात पाणी, विसर्ग वाढणार?
  नदीकाठच्या लोकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

  18:37 (IST)

  विरोधी पक्षनेत्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
  देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर कोल्हापुरात
  शिरोळमधील पूरस्थितीची केली पाहणी
  पूरग्रस्तांना तातडीनं मदत करा - देवेंद्र फडणवीस
  'आम्ही जी मदत केली होती तशी सरकारनं करावी'
  मदत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम - फडणवीस

  18:19 (IST)

  'ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापणार'
  ऊर्जामंत्री नितीन राऊतांची चिपळूण दौऱ्यात घोषणा

  18:18 (IST)

  विरोधी पक्षनेत्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
  देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर कोल्हापुरात
  शिरोळमधील पूरस्थितीची करणार पाहणी
  विरोधी पक्षनेत्यांचा प.महाराष्ट्राचा 3 दिवसांचा दौरा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स