LIVE Updates: राज्यात आज 4666 नवीन कोरोना रुग्ण, 131 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 29, 2021, 20:50 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:44 (IST)

  कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले - राणे
  घरावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार - राणे
  कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही - राणे
  माझ्या पाठीशी संपूर्ण दिल्लीतील नेते - नारायण राणे
  शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे - नारायण राणे
  'आमच्यासारख्या शिवसैनिकांमुळे उद्धव ठाकरे आज सीएम'

  21:31 (IST)

  नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप
  भाजपचं सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात शक्तिप्रदर्शन
  लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा - नारायण राणे
  '10 दिवसांत जनआशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद'
  नारायण राणेंनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
  यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आनंद - राणे
  आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत - राणे
  'माझ्यासोबत हे कार्यकर्ते असणं नशीब लागतं'
  'मोदींची विनम्रता एवढी आहे मी कधी पाहिली नाही'
  मला डिवचण्याचा प्रयत्न कोणी केला नाही - राणे

  21:9 (IST)

  नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप
  भाजपचं सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात शक्तिप्रदर्शन
  लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा - प्रवीण दरेकर
  'आपल्या यात्रेची उंची वाढवण्याचं काम सेनेनं केलं'
  'जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात स्मृतिस्थळापासून'
  'खरं तर शिवसेनेला अभिमान वाटायला हवा होता'
  विनायक राऊतांकडून पहिला अपशकुन - दरेकर
  'सीएमना जे माहीत नाही ते सांगितलं, काहीही चूक नाही'
  चिकित्सक प्रकारे राणेंच्या अटकेचा प्रयत्न - दरेकर
  त्यानंतरही यात्रेला कोकणात मोठा प्रतिसाद - दरेकर

  20:32 (IST)

  राज्यात दिवसभरात 4,666 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 3,510 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 131 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 52 हजार 844 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:8 (IST)

  ईडीनं नोटीस दिली आहे - अनिल परब
  'नोटिसीत कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही'
  फक्त हजर राहण्याचे आदेश - अनिल परब
  कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देईन - परब

  19:19 (IST)

  कितीही नोटिसा पाठवा, डगमगणार नाही - राऊत
  सरकार मजबूत आहे आणि राहणार - संजय राऊत
  'केंद्राचं किती लक्ष आहे हे नोटिसीवरून कळतं'

  19:0 (IST)

  अनिल परब यांना ईडीनं बजावली नोटीस
  मंगळवारी हजर राहण्याचे परबांना आदेश
  अनिल देशमुख प्रकरणी ईडीकडून नोटीस
  वाझेनं जबाबात घेतलं होतं अनिल परबांचं नाव

  18:3 (IST)

  'परिवहन मंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस'
  शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्विट
  'जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच नोटीस'
  वरचं सरकार कामाला लागलं - संजय राऊत
  भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता - संजय राऊत
  कायदेशीर लढाई कायद्यानंच लढू - संजय राऊत

  17:54 (IST)

  कोरोना नियमांचं पालन करावे - अजित पवार
  तिसरी लाट केरळमध्ये आली आहे - अजित पवार
  'केंद्रानंही आपल्याला काळजी घ्यायला सांगितलं'
  'पुण्यात सहकार भवन, कृषी भवन उभारणार'
  'गोरगरीबांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत'
  'पुण्याच्या विकासासाठी सर्वांचा हातभार लागावा' 
  पुणे झोपडपट्टीविरहित करण्याचा प्रयत्न - अजित पवार
  'काळजी घेऊन सण-उत्सव साजरे केले पाहिजेत'
  एक चूक महागात पडू शकते - अजित पवार
  'कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी'
  'ज्यांना चाव्या मिळणार आहेत त्यांनी घर विकू नये'

  17:2 (IST)

  'मनसेच्या दहीहंडीला 48 गोविंदा पथकांचा प्रतिसाद'
  आतापर्यंत 48 पथकांची नोंदणी - अविनाश जाधव
  'पथकांच्या लसींची माहिती घेण्यात आली आहे'
  ठाणे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधवांची माहिती
  'उत्सवासाठी मनसेचे सर्व मोठे नेते उपस्थित राहतील'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स