• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

Live Updates: केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 27, 2022, 23:49 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  23:47 (IST)

  शरद पवारांनी आज मांसाहार केल्याचं कारण सांगून दगडूशेठचं दारातूनच दर्शन घेणं पसंत केलं. भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मात्री आज रात्री थेट मंदिरात जाऊन बाप्पांची यथासांग आरतीच केली

  21:30 (IST)

  देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर प्रतिक्रिया
  पाहून चांगलं वाटलं - देवेंद्र फडणवीस
  'नेत्यांची श्रद्धा वाढली पाहिजे, अंधश्रद्धा नको'
  'नेत्यांची वाढली की लोकांचीही श्रद्धा वाढते'

  संभाजीराजेंची पद्धतशीर कोंडी केली - फडणवीस
  'आश्वासन दिलं, नेहमीप्रमाणे फोन उचलला नाही'
  'माझाही उचलला नव्हता, तेव्हाही असंच केलं होतं'

  19:54 (IST)

  ATS प्रमुख विनीत अग्रवाल मुख्यमंत्र्यांना भेटणार
  पुणे एटीएस प्रकरणावर भेटीदरम्यान चर्चा करणार

  19:28 (IST)

  मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंना नोटीस
  संसदीय समितीकडून राणांच्या तक्रारीची दखल
  15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचे आदेश
  पोलीस महासंचालकांनाही बजावली नोटीस
  राज्याच्या मुख्य सचिवांनाही दिल्लीत बोलावलं

  19:19 (IST)

  राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय 'ब्रेक'
  'मेमध्ये बदल्यांचा आदेश सरकारनं काढला होता'
  राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
  बदल्या 1 महिना पुढे ढकलण्याचा मविआचा निर्णय
  निवडणुकीत आमदारांची नाराजी ओढवून घ्यायची नाही
  त्यामुळेच बदल्या पुढे ढकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

  19:5 (IST)

  - महाराष्ट्रात दिवसभरात तब्बल 536 नवे कोरोनाबाधित
  - एकट्या मुंबईत गेल्या 24 तासात 352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  - राज्यात सध्या 2568 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण

  19:4 (IST)

  'संभाजीराजे छत्रपतींचा गेम झालाय'
  आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा आरोप
  'गेम कोणी केला हे त्यांना चांगलं माहीत'

  18:18 (IST)

  नवनीत राणांना काही अटींवर हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी, राणा दाम्पत्याला नागपूर विमानतळावरून रॅलीची परवानगी नाकारली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवनीत राणा यांना वेगळा वेळ, राष्ट्रवादीचा कार्यक्रम संपल्यावर राणांना हनुमान चालिसासाठी वेळ, अटी-शर्थींचं उल्लंघन झाल्यास कारवाई होणार, राष्ट्रवादी आणि राणांच्या कार्यक्रमात भोंग्याची परवानगी नसणार, राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्यानं प्रक्षोभक वक्तव्य करू नये ही अट - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

  17:57 (IST)

  अनिल देशमुख यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब अती जास्त असल्यामुळे Stress Thallium Heart test करायची असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. त्यामुळे त्यांना मुंबई येथील K.E.M. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  17:38 (IST)

  अविनाश भोसलेंची रवानगी नजरकैदेत
  अविनाश भोसले 30 तारखेपर्यंत नजरकैदेत
  अविनाश भोसले पुण्यातील मोठे व्यावसायिक
  सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टाचे आदेश
  सुनावणी पूर्ण न होऊ शकल्यानं दिले आदेश
  CBIच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश
  2 दिवस सं. 5 ते 6 वकिलांना भेटू देण्याची मुभा
  CBI नं 10 दिवसांसाठी मागितली होती रिमांड
  सीबीआयची कारवाई बेकायदेशीर - भोसले
  अविनाश भोसलेंच्या वतीनं रिमांडला विरोध
  दाखल अर्जाला उत्तरासाठी सोमवारपर्यंतची मुदत
  30 मे रोजी स.11 वा. कोर्टापुढे हजरीचे निर्देश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स