Live Updates: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख परिसराला भूकंपाचे धक्के

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 25, 2021, 22:14 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:43 (IST)

  औरंगाबाद : कन्नड-चाळीसगाव घाटातील प्रकार
  'ट्रॅफिक पोलिसांवर जोरदार वसुलीचा आरोप'
  भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी केला दावा
  ट्रक ड्रायव्हर बनून वसुलीचं केलं स्टिंग ऑपरेशन
  'अवजड वाहनांसाठी घेतले जात होते प्रत्येकी 500 रु.'
  घाट धोकादायक झाल्यानं वाहतुकीसाठी केलेला बंद
  पैसे घेऊन अवजड वाहनं सोडत असल्याचा आरोप
  भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी केला दावा

  18:59 (IST)

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची तब्येत ठणठणीत
  अण्णांची तब्येत चांगली, काळजीचं कारण नाही
  अण्णांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती

  18:56 (IST)

  'सदाभाऊ, पडळकर दोन्ही नेते राज्याला माहीत आहेत'
  आंदोलन टोकाचं नेऊन न्याय मिळवला - प्रवीण दरेकर
  आमची भूमिका कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे - दरेकर
  'विलीनीकरणाबाबत सरकार सकारात्मक, असं म्हणतं'
  'आंदोलन तुमचं, दोन्ही नेत्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं'
  प्रवीण दरेकरांचं गुणरत्न सदावर्तेंवर टीकास्त्र
  करणी आणि कथनीमध्ये फरक दिसतो - दरेकर

  18:52 (IST)
  हिवाळी अधिवेशन नागपूरला होणं अपेक्षित, मुंबईला अधिवेशन आठवड्याचं आहे, त्यामध्ये सुट्टी आल्यामुळे फक्त दोन ते तीन दिवसच अधिवेशन चालेल, आज महिला अत्याचार, इतर विषय आहेत, आम्ही हे सगळे विषय मांडणार होतो पण हिवाळी अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव आहे - प्रवीण दरेकर
   
  18:19 (IST)

  फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर मुंबईत
  परमबीर सिंगांची गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी
  मुंबईतल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात झाली चौकशी

  17:38 (IST)

  बुलडाणा : जळगाव-जामोद दरम्यान नवीन येरळी गावाजवळची घटना, क्रूझर-ट्रक अपघातात 6 गंभीर जखमी

  17:29 (IST)

  पुणे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना अशक्तपणा जाणवल्यानं रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल, अण्णांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

  17:10 (IST)

  अण्णा हजारे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल
  अण्णा हजारेंच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी
  अण्णा लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली

  17:6 (IST)

  राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच
  अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर दरम्यान होणार
  सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक
  बैठकीत तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार

  16:54 (IST)

  पुणे - जमीन हडपण्यासाठी गावगुंडांकडून मारहाण
  महिला आणि मुलींना गावगुंडांकडून बेदम मारहाण
  22 तारखेला शेतात मारहाण, प्रकार मोबाईलमध्ये कैद
  आरोपी अजून मोकाट, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  एक महिला जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स