LIVE: लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या, प्रवीण दरेकरांची मागणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 21, 2021, 15:41 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:6 (IST)

  नाशिक - त्र्यंबकेश्वरात पावसाचं तांडव, सर्व रस्ते जलमय
  त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांना आलं अक्षरश: नदीचं रूप

  22:5 (IST)

  त्रंबकेश्वर - मुसळधार पावसाचा जोरदार फटका, वटकपाडा साठवण बंधारा फुटला, या बंधाऱ्याचं सुरू होतं काम, संततधार पावसानं उखडले बंधाऱ्याचे कठडे, बांध भराव गेला वाहून, लागवड केलेली रोपं गेली वाहून, तर भात, नागली, वरई या पिकांचं मोठं नुकसान, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी, पंचनामा करून नुकसानभरपाईची जलपरिषदेनं केली मागणी

  21:40 (IST)

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी काल दुपारी पंकजा मुंडेंची भेट घेतली, मुंडे भगिनींच्या कथित नाराजी नाट्यानंतर चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांची पहिली भेट, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडेंमध्ये वरळीतल्या कार्यालयात तासभर चर्चा , प्रदेश पातळीवरून पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू

  21:24 (IST)

  11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे, 20 जुलैपासून 26 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळानं संकेतस्थळ केलं होतं सुरू, मात्र तांत्रिक कारणास्तव हे संकेतस्थळ बंद केलंय, बोर्डानं पत्रक जारी करून कळवलं, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा अवधी दिला जाईल - बोर्ड

  20:41 (IST)

  नाशिक - चालत्या कारवर कोसळलं झाड
  अपघातात तिघांचा मृत्यू, 2 किरकोळ जखमी
  दिंडोरीच्या वलखेड फाट्यावरील घटना

  20:34 (IST)

  मुंबई-आग्रा मार्गावर कार-कंटेनरचा विचित्र अपघात
  अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी
  नाशिक शहराच्या वेशीवर वाडीवऱ्हेजवळची घटना

  18:38 (IST)

  'अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचं पाप करू नका'
  जलयुक्त शिवार योजना ही लोकहिताचीच - शेलार
  'निव्वळ फडणवीसांच्या योजनेला बदनाम करण्याचा हेतू'
  आशिष शेलारांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

  18:37 (IST)

  मुंबईत 23 जुलैपासून लसीकरण होणार सुरू
  शासकीय, पालिका केंद्रांवर लसीकरण होणार सुरू
  आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होणार साठा
  उद्या दिवसभरात लस केंद्रांना वितरण करणार

  18:17 (IST)

  राज्यात ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू नाही - टोपे
  'प्रतिदिन 16 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध केला'
  'नाशिकमध्ये ऑक्सिजन प्लांट दुर्घटनेत मृत्युमुखी पडले'
  नाशिकमध्ये घडलेला तो अपघात होता - राजेश टोपे
  बर्ड फ्लूबाबत आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा
  लोकल सुरू करण्याबाबत सीएम निर्णय घेतील - टोपे

  17:39 (IST)

  जलयुक्त शिवार चौकशी समितीचा अहवाल सादर
  अध्यक्ष विजय कुमारांकडून सरकारला अहवाल
  एकूण सतराशे प्रकरणांची होणार चौकशी
  अनेक प्रकरणांमध्ये खातेनिहाय चौकशी
  ज्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे
  त्या प्रकरणात एसीबीनं चौकशी करावी
  जिल्हाधिकाऱ्यांनी खातेनिहाय चौकशी करावी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स