Live Updates : 106 नगरपंचायतीसाठी 76 तर पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 21, 2021, 23:14 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:31 (IST)

  आरोग्याच्या कारणावरून राज्यावर अन्याय करू नका, 3 पक्षांचं सरकार आहे तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा, आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या - चंद्रकांत पाटील

  21:28 (IST)

  ओबीसींना संविधानिक आरक्षण मिळवून देण्याची मंत्री छगन भुजबळांची मागणी, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार - छगन भुजबळ

  20:49 (IST)

  विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत बैठकीत चर्चा, कॉंग्रेस हायकमांडच्या निर्णयाप्रमाणे अध्यक्षाची निवड होणार, पेपरफुटी प्रकरणी काँग्रेस मविआ सरकारमध्ये असलं तरी आम्ही जाब विचारणार - नाना पटोले

  20:43 (IST)

  शिवसेना नेते रवींद्र वायकरांची ईडीकडून चौकशी
  ईडीनं महत्त्वाच्या गुन्ह्यात केली वायकरांची चौकशी
  रवींद्र वायकरांची तब्बल 7 तास चालली चौकशी

  19:47 (IST)

  'मविआ'मधील सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांची उद्या बैठक
  सर्व विधानसभा, विधान परिषद सदस्यांची बैठक
  उद्या सकाळी अधिवेशनापूर्वी 9 वाजता बैठक
  या बैठकीत मुख्यमंत्री व्हीसीद्वारे सहभागी होणार
  त्यानंतर अधिवेशनात मात्र मुख्यमंत्री हजेरी लावणार

  19:43 (IST)

  राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 11 रुग्ण
  मुंबई विमानतळावरील तपासणीत 9 रुग्ण आढळले
  पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद, नवी मुंबईत प्रत्येकी 1 रुग्ण
  आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 65 रुग्ण

  19:4 (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद
  'यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार'
  पुढील हिवाळी अधिवेशन नागपुरात - अजित पवार
  'सर्वच मुद्यांना उत्तर देण्याची सरकारची तयारी'
  'वीजबिल, OBC आरक्षण, परीक्षा घोटाळ्यावर चर्चा'
  'कोरोनामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी'
  'इतर राज्यांमध्येही अधिवेशन कमी दिवसांचं'
  'दारूवरील कर आधीच वाढवलेला होता'
  अधिवेशनात शक्ती विधेयक मांडणार - अजित पवार
  'प्रलंबित विधेयकांसह 26 विधेयकं मांडणार'
  तीनही कृषी कायदे मागे घेणार - उपमुख्यमंत्री
  'काहीतरी मुद्दे काढून बहिष्कार घालणं अयोग्य'
  'आमदारांचं निलंबन त्यावेळची परिस्थिती पाहूनच'
  'आमदारांचं निलंबन असभ्य भाषेमुळे झालं'
  'विस्तृत भूमिका अधिवेशनात मांडली जाईल'
  'कुलगुरूंच्या अधिकाराबाबतही बोललं जातंय'
  भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल
  कांगावा करण्याचा केविलवाणा प्रयत्न - अजित पवार
  'पोलीस चौकशी करतील, कोणताही दबाव नाही'
  'परीक्षा घोटाळा प्रकरणी कारवाई होणार'
  'मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक कारभार'
  'सरकारचं पोलीस खातं चौकशी करण्यास समर्थ'
  'भरतीबाबतचा निर्णय पोलिसांच्या निकालानंतर'
  'नियुक्त प्रक्रियेत अनियमितता असल्यास रद्द करू'
  'पण पोलिसांच्या चौकशी अहवालानंतर हे होईल'
  मुख्यमंत्री आज 'वर्षा'वर आले होते - अजित पवार
  उद्या सकाळी मविआची बैठक - अजित पवार
  उद्धव ठाकरेंची तब्येत उत्तम - अजित पवार
  'हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उपस्थित राहणार'
  'हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार'
  'विरोधकांना अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार'
  ST कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली - अजित पवार
  एसटी कर्मचारी हळूहळू रुजू होतायत - अजित पवार

  18:32 (IST)

  विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत मोठी बातमी
  ...तर भाजप उमेदवार देणार - देवेंद्र फडणवीस

  18:31 (IST)

  'आरोग्याच्या कारणावरून राज्यावर अन्याय नको'
  मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं - चंद्रकांत पाटील
  'पण त्यासाठी तुम्ही कोणाकडे तरी चार्ज द्या'
  '3 पक्षांचं सरकार, मिळून एक मंडळ तयार करा'
  आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या - चंद्रकांत पाटील

  18:12 (IST)

  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलासा
  लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वाढवला
  आता 3 तासांऐवजी साडेतीन तासांची परीक्षा
  कोरोना काळात लिखाणाची सवय कमी झाल्यानं निर्णय
   

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स