LIVE: ऑगस्टच्या सुरुवातीलाचा कोरोनाची धक्कादायक आकडेवारी! कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा घटला, दैनंदिन रुग्ण मात्र 6 हजार पार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 01, 2021, 20:01 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:58 (IST)

  चिपळूणमधील आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजारांपैकी 5 हजार उद्यापासून खातेधारकांच्या खात्यात होणार जमा, पुरात बाधित लोकांना राज्य सरकारचा तात्पुरता दिलासा
  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट, चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत 
  यांनी 50 लाखांचा निधी केला जाहीर, चिपळूण आणि रत्नागिरीमधील बाधित ग्रंथालयांनाही तातडीची 5 लाखांची मदत, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांनी श्रेयवाद करू नये, श्रेयवाद करणाऱ्यांना जनता सोडणार नाही

  20:30 (IST)

  प्रत्येकाचा बालेकिल्ला असतो पण बदल होत असतो ना, कम्युनिस्टांचा बालेकिल्ला लालबाग-शिवडी होता, आता त्यांचं नामोनिशाण नाही, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवडी महापालिका आपला बालेकिल्ला असेल - प्रवीण दरेकर

  19:27 (IST)

  राज्यात दिवसभरात 6,479 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 4,110 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 157 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96.59 तर मृत्युदर 2.01 टक्के
  राज्यात सध्या 78 हजार 962 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:3 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक - पुरुष हॉकी स्पर्धा
  पुरुष हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक
  क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा केला पराभव

  18:21 (IST)

  सांगली - पलूस तालुक्यातील दुधोंडी इथं तिहेरी खून
  धारधार शस्त्रानं वार करून खून तर 3 गंभीर जखमी

  18:18 (IST)

  वरळीकरांना मिळणार त्यांच्या हक्काचं घर
  वरळी बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास
  'कामाला फडणवीस सीएम असतानाच परवानगी'
  वि.प.चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
  मराठी माणसाला घर मिळाल्याचा आनंद - दरेकर
  मुख्यमंत्र्यांची थप्पडबाजी भाषा दुर्दैवी - प्रवीण दरेकर
  'मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीला असं बोलणं अयोग्य'

  17:59 (IST)

  आज 'महसूल दिन' आम्ही साजरा करतोय - थोरात
  'सेवा पारदर्शी, डिजिटल पद्धतीनं देण्यासाठी प्रयत्न'
  आजपासून सातबारा नव्या रूपात देणार - थोरात
  सातबारा उताऱ्याचं स्वरूप बदलणार - थोरात
  'फेरफारही ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार'
  'मिळकत पत्रिकासुद्धा आता ऑनलाईन मिळणार'
  बहुतांश महसूल सेवा आता ऑनलाईन - थोरात
  ई-पीक पाहणीसुद्धा उपलब्ध होणार - थोरात
  तलाठ्याला शेतावर जाण्याची गरज नाही - थोरात

  17:56 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक - बॅडमिंटन स्पर्धा
  ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं मेडल
  भारताच्या पी.व्ही. सिंधूला ब्रॉंझ मेडल
  सिंधूनं चीनच्या बॅडमिंटनपटूला चारली धूळ
  पी.व्ही. सिंधू 2 मेडल जिंकणारी पहिली भारतीय

  17:18 (IST)

  पुणे - आंबेगाव तालुक्यातील एकलहरेची घटना
  अज्ञातांकडून तरुणाची गोळीबार करून हत्या
  मृत तरुण हा हमालाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी
  मंचर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू

  15:16 (IST)

  'गेल्या कोरोना लॉकडाऊनमध्ये 16 व्यापारी आत्महत्या'
  फतेचंद रांका यांची पत्रकार परिषदेत माहिती
  'आताही 4 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरूच आहे'
  फक्त व्यापाऱ्यांनाच बंदी का? - फतेचंद रांका
  इतर उद्योगधंदे सुरूच आहेत - फतेचंद रांका
  'मग आमच्यावर कोरोनाची बंधनं कशासाठी?'
  'कोरोना टास्क फोर्स कधीही पुण्यात आली नाही'
  मग रिपोर्ट कशाच्या आधारावर? - फतेचंद रांका
  'पुण्यात रुग्णसंख्या कमी, निर्बंध का उठवले जात नाही?'
  1 लाख कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे - फतेचंद रांका
  आम्ही व्यापारी लसीकरणास तयार - फतेचंद रांका
  पण सरकार परवानगी देत नाही - फतेचंद रांका
  'आतापर्यंत 6 हजार स्टाफचं लसीकरण करू शकलो'
  'आम्हाला परवानगी द्या, आम्ही लस विकत घेतो'
  निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान - फतेचंद रांका
  आताही 2 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात - रांका
  व्यापारी कर्जबाजारी बनलेत - फतेचंद रांका
  'आम्हाला दुकानं उघडण्याची वेळ वाढवून द्या'
  पुणे व्यापारी महासंघाचं मंगळवारी घंटानाद आंदोलन
  '...तर बुधवारपासून 4 नंतरही दुकानं सुरूच ठेवणार'
  पुणे व्यापारी महासंघाचा राज्य सरकारला इशारा
  'व्यापाऱ्यांना अटक केली तरी मागे हटणार नाही'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स