Live Updates: गणपतीपुळे इथं समुद्रात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 19, 2021, 23:48 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:44 (IST)

  उद्या काही पाहुणे घरी येणार आहेत - नवाब मलिक
  'चहा आणि खाद्यपदार्थ देऊन स्वागत करणार'
  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचं सूचक ट्विट

  21:2 (IST)

  कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना
  पुणे शहर शिवसेनेनं दिलं अमित शाहांना निवेदन

  20:18 (IST)

  'महिलांबाबत आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना'
  'चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती'
  माझ्या वक्तव्याचा विपर्यास - गुलाबराव पाटील
  'कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी'

  19:39 (IST)

  महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे नवीन 6 रुग्ण
  मुंबई 4, पुणे 1, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 रुग्ण
  आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 54 रुग्ण

  18:57 (IST)

  '2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात आलो होतो'
  शिवसेनेशी मीच बोललो होतो - अमित शाह
  'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं'
  मी खोटं बोललो म्हणतात ठीक, मान्य - अमित शाह
  तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते? - शाह
  तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं - अमित शाह
  म्हणून तुम्ही खोटं बोललात, हिंदुत्व सोडलं - शाह
  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - अमित शाह
  निवडणुकीला सामोरं जा, अमित शाहांचं आव्हान
  'तिघेही विरोधात लढा, बघा काय अवस्था होते'
  'शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली नव्हती'
  सेनेनं आमच्यासोबत विश्वासघात केला - शाह
  'ही 3 चाकी रिक्षा बंद पडलीय, चाकात हवा नाही'
  'पेट्रोल स्वस्त करण्याऐवजी दारू स्वस्त केली'
  'या सरकारच्या हातात राज्य कसं चालेल?'
  अमित शाहांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

  18:20 (IST)

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुणे दौरा
  शाहांचा भाजप कार्यकर्ते, नगरसेवकांशी संवाद
  पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंचमध्ये कार्यक्रम
  'जय शिवाजी, जय भवानी'च्या घोषणा देत भाषण
  '2 दिवसांपासून राज्यात छोटे-मोठे 10 कार्यक्रम'
  पण हा कार्यक्रम करण्यात जास्त आनंद - शाह
  'बूथ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली'
  'फक्त भाजपात बूथ कार्यकर्ता अध्यक्ष बनू शकतो'
  भाजप कार्यकर्तेच पक्षाचं भवितव्य - अमित शाह
  भाजप हा सर्वात मोठा पक्ष - अमित शाह
  'जिथं कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं तिथं सरकार आलं'
  'प्रत्येक मतदारासमोर जाताना छाती मोठी करून जा'
  'तुमच्या नेतृत्वानं कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही'
  370 हटवलं, काशी कॉरिडॉर बनवलं - अमित शाह
  राम मंदिरही बनवलं, जे बोललो ते केलं - शाह
  महाराष्ट्रात पालखी मार्ग केले - अमित शाह
  हवाई मार्गानं देवस्थान जोडलं - अमित शाह
  काँग्रेस व्होट बँक जाईल म्हणून घाबरते - शाह
  मोदी भारतीय संस्कृतीचे ध्वजप्रवर्तक - अमित शाह
  'कोरोना काळात महाराष्ट्रात सरकार होतं का?'

  16:39 (IST)

  सोलापुरात 623 किलो गांजा पकडला
  इनोव्हा गाडीतून सुरू होती गांजा तस्करी
  623 किलो गांजाची किंमत 1 कोटी 24 लाख
  विजापूर नाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
  2 आरोपींनी केलं पलायन, एक आरोपी अटकेत

  16:25 (IST)

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर
  दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं पुणे दौरा सुरू
  शाहांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद‌्घाटन
  डॉ.बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण
  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ
  पुणे महापालिकेत अमित शाहांच्या हस्ते शुभारंभ
  शाहांकडून पुणे महापौर आणि टीमला शुभेच्छा
  'शिवरायांची ही भव्य प्रतिमा विचार-प्रेरणा देईल'
  'त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली'
  शिवाजी महाराजांनी देशभक्ती शिकवली - शाह
  'अष्टप्रधान मंडळ उत्तम प्रशासनाचा आदर्श'
  'डॉ.बाबासाहेबांचा संविधान लिहिण्यात मोठा वाटा'
  'डॉ.बाबासाहेबांनी संविधान लिहून उद्धार केला'
  'कटुता झेलूनही ती संविधानात उमटू दिली नाही'
  'डॉ.बाबासाहेबांचं जगभरातील सर्वश्रेष्ठ संविधान'
  'कॉंग्रेसनं अपमानित करण्याची संधी सोडली नाही'
  'भारतरत्न' बिगरकाँग्रेसी सरकारनं दिलं - शाह
  काँग्रेस आजही विरोध करते - अमित शाह
  'डॉ.बाबासाहेबांचं योगदान उज्ज्वल करून दाखवणार'
  केंद्राकडून पुणे विकासासाठी अनेक उपाय - शाह
  'विमानतळासाठी प्रयत्न केले, पण काम थांबलंय'
  नरेंद्र मोदींनी मेट्रोचं अनावरण केलं - अमित शाह
  केंद्रानं स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी दिले - शाह
  'मुळा-मुठासाठी 110 कोटी रुपयांचं काम सुरू'
  पुण्यात अनेक विकास प्रकल्पांचं नियोजन - शाह
  दोन्ही पुतळ्यांचा संकल्प केल्याबद्दल सर्वांचे आभार

  16:13 (IST)

  'आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो'
  'मात्र तुम्ही लोकांची घरं फोडायची कामं करता'
  उदयनराजे भोसलेंची शिवेंद्रराजेंवर टीका

  16:5 (IST)

  गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण
  पालकमंत्र्यांनी माफी मागावी - रूपाली चाकणकर
  '...अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स