Live Updates : विधानसभेच्या 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | January 18, 2022, 16:07 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    21:43 (IST)

    मध्य रेल्वे प्रशासनानं मनमानी करू नये - आव्हाड
    'रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्यांना पर्यायी जागा द्यावी'
    पर्यायी व्यवस्थेनंतरच घरं खाली करणार - आव्हाड
    रेल्वेची मनमानी चालणार नाही - जितेंद्र आव्हाड
    आम्ही 'त्या' गोरगरीब लोकांबरोबर उभे राहू - आव्हाड

    21:43 (IST)

    मध्य रेल्वे प्रशासनानं मनमानी करू नये - आव्हाड
    'रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्यांना पर्यायी जागा द्यावी'
    पर्यायी व्यवस्थेनंतरच घरं खाली करणार - आव्हाड
    रेल्वेची मनमानी चालणार नाही - जितेंद्र आव्हाड
    आम्ही 'त्या' गोरगरीब लोकांबरोबर उभे राहू - आव्हाड

    21:26 (IST)

    INS रणवीरच्या अंतर्गत भागात स्फोट
    स्फोटात नेव्हीच्या 3 जवानांचा मृत्यू

    21:1 (IST)

    नाना पटोलेंविरोधात भाजपचं आंदोलन प्रकरण
    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश
    कोरोना संक्रमित आमदाराच्या आंदोलनप्रकरणी चौकशी
    नागपूर पोलीस आयुक्तांना दिले चौकशीचे आदेश

    20:41 (IST)

    पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरूपदी डॉ.अजित रानडे, 4 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार, 5 वर्षांसाठी अजित रानडेंची या पदावर निवड

    19:11 (IST)

    मुंबईत दिवसभरात 6 हजार 149 नवे रुगण
    मुंबईत दिवसभरात 12 हजार 810 रुग्ण बरे
    मुंबईत दिवसभरात 7 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू

    19:4 (IST)

    गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे निर्देश

    18:52 (IST)

    नागपूर - जरीपटका भागातील धक्कादायक प्रकार
    मदन अग्रवालनं विष प्राशन करून केली आत्महत्या
    2 मुलांची आणि पत्नीची चाकूनं वार करून हत्या
    आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल, पोलिसांचा अंदाज
    शेजाऱ्यांनी चौकशी केली असता घटना उघडकीस
    नागपूरचे जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल

    18:38 (IST)

    'बूस्टर डोससाठी सेंटरची संख्या वाढवलीय'
    अतिरिक्त मनपा आयुक्त काकाणींची माहिती
    '15 ते 18 वयोगटासाठी शाळा-कॉलेजमध्ये कॅम्प'

    350 लसीकरण सेंटर्स सुरू केलीत - सुरेश काकाणी
    मुंबईतील कोरोना स्थिती, आरोग्य व्यवस्था, लसीकरण
    'या संदर्भातील स्थिती आम्ही राज्य सरकारला देऊ'
    'शाळांबाबत अहवाल लवकरच टास्क फोर्सला पाठवू'
    डेल्टा कमी होऊन ओमायक्रॉन वाढतोय - काकाणी

    18:32 (IST)

    वर्धा - आर्वीतील अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण
    डॉ.नीरज कदमला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स