liveLIVE NOW

Live Updates: केंद्रीय मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 17, 2021, 23:38 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 11 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:31 (IST)

  संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी समन्स जारी
  येत्या 29 नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरू होणार

  आगामी 23 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार

  21:29 (IST)

  सीबीआय समन्सविरोधात राज्य सरकार हायकोर्टात
  सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना दिलेत समन्स
  सरकारच्या भूमिकेवर सीबीआयची कोर्टात नाराजी
  'आमच्या तपासात अडथळ्यांसाठी समांतर तपास'
  समांतर तपासाबाबत सीबीआयकडून जाहीर नाराजी
  'तपासाला राज्य सरकार एकप्रकारे विरोध करतंय'
  'राज्य सरकारला विरोधाचा अधिकार आहे का?'
  सीबीआयनं हायकोर्टात विचारला सवाल

  20:13 (IST)

  शरद पवार 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर
  'राष्ट्रवादी स्थापनेनंतर आयुष्यातला हा पहिला दिवस'
  'मी नागपूरला आलो, अनिल देशमुख माझ्यासोबत नाही'
  देशमुखांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी सक्षमपणे हाताळली - पवार
  मात्र काहींकडून केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग - शरद पवार
  काही लोकांना सत्ता गेल्यानं करमत नाही - शरद पवार
  अनिल देशमुखांची वस्तुस्थिती मला माहीत आहे - पवार
  काय घडलं ते त्यांनी मला सांगितलं होतं - शरद पवार
  आरोप करणारा फरार, देशमुख आतमध्ये - शरद पवार
  केंद्रीय संस्थेच्या कारवाईवर शरद पवारांचा घणाघात
  'सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
  'काहींच्या डोक्यात सत्ता गेली, सूडाचं राजकारण'
  मात्र आमचे कार्यकर्ते व्याजासह अद्दल घडवणार - पवार

  19:52 (IST)

  'दहावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्र स्वीकारणार'
  '18 नोव्हेंबरपासून आवेदनपत्र स्वीकारणार'
  'विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत'
  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचं आवाहन

  19:16 (IST)

  अचानक आलेल्या पावसानं नाशिककरांची तारांबळ
  नाशिक शहराच्या सर्वच भागात पावसाची संततधार
  ढगांच्या गडगडाटासह नाशिक शहरात अवकाळी
  साहित्य संमेलनाच्या तयारीला पावसाचा फटका

  17:43 (IST)

  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित
  खंडणी प्रकरणी परमबीर सिंग फरार घोषित
  मुंबई किला कोर्टानं केलं फरार घोषित
  गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार घोषित
  परमबीरांविरुद्ध व्यावसायिकानं केली होती तक्रार
  रियाज भाटी, विनय सिंग हेदेखील फरार घोषित

  17:42 (IST)

  यंदाचा 19 वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल होणार डिसेंबरमध्ये, 2 ते 9 डिसेंबरला रंगणार फिल्म फेस्टिव्हल, तब्बल 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची रसिकांना मेजवानी मिळणार, पुण्यातील PVR आयकॉन, कॅम्पमधील आयनॉक्स आणि NFAI मध्ये चित्रपट दाखवले जाणार, फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल यांची माहिती

  17:23 (IST)

  राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका
  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
  पुढचे 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता
  कोकण, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट
  13 जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता

  16:54 (IST)

  कुलभूषण जाधवांसंदर्भात मोठी बातमी
  पाकिस्तानच्या संसदेत बिल झालं पास
  कुलभूषण जाधवांना अपिलाचा अधिकार

  16:51 (IST)

  राज्यातील काही शहरात हिंसाचार - शरद पवार
  पोलिसांनी हिंसाचार नियंत्रित आणला - पवार
  'मात्र हिंसाचारात व्यापाऱ्यांच्या दुकानांचं नुकसान'
  'मदत, नुकसानभरपाईबाबत नव्या धोरणाची गरज'
  राज्य सरकारनं यावर विचार करावा - शरद पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स