Live Updates: राहुल गांधींनी ED कडे मागितली उद्याची सुटी; परवा चौकशीला राहावं लागणार उपस्थित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 15, 2022, 21:00 IST |
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:42 (IST)

  पंतप्रधान मोदी 19 जूनला दिल्लीत बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी पहिल्या टॉर्च रिलेचं करणार प्रक्षेपण

  21:36 (IST)

  आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे - नाना पटोले
  'मतांची जुळवाजुळव करण्याची गरज नाही'
  आडनावावरून जात कळत नाही - नाना पटोले
  'या सर्वेक्षणामुळे ओबीसींची संख्या कळणार नाही'
  याबाबत मुख्य सचिवांची आज भेट घेतली - पटोले
  'ओबीसींवर अन्याय न होण्याची काळजी घ्यावी'
  भाजप पैसेवाले पार्टी; नाना पटोलेंचा निशाणा
  'आम्ही आमदारांना छोट्याशा हॉटेलमध्ये ठेवू'
  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर अति झालाय - पटोले
  'कोणताही दोष नसताना गुन्हा दाखल झालेला नाही'
  3 दिवसांपासून राहुल गांधींना त्रास - नाना पटोले

  21:25 (IST)

  राहुल गांधींची ईडीकडून आजची चौकशी पूर्ण
  सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून झाडाझडती
  राहुल गांधींची उद्या चौकशी होणार नाही
  राहुल गांधींना शुक्रवारी ईडीकडून समन्स

  20:45 (IST)

  राहुल गांधींची ईडीकडून चौकशी अजूनही सुरू
  सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून झाडाझडती
  आजही रात्री उशिरापर्यंत चौकशी राहू शकते सुरू

  20:37 (IST)

  दक्षिण-पश्चिम नागपूरमधील झोपडपट्टीधारकांवर कारवाई नाही, रेल्वेमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना आश्वासन, डीआरएम यांनाही निर्देश

  20:21 (IST)

  उद्या संध्याकाळी मविआची 'वर्षा'वर बैठक
  विधान परिषद निवडणुकीबाबत होणार चर्चा
  मुख्यमंत्र्यांसह मविआचे प्रमुख नेते राहणार हजर
  सहाव्या जागेसाठी मतं जुळवण्याचा प्रयत्न - सूत्र

  20:12 (IST)

  यूपीत सुरू असलेली बुलडोझर कारवाई
  कारवाईविरुद्ध जमियत उलेमा-ए-हिंदची याचिका
  याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
  'यूपी सरकारनं बुलडोझर कारवाई थांबवावी'
  'जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी'
  जमियत उलेमा-ए-हिंदच्या याचिकेत मागणी

  20:9 (IST)

  उद्या प्रदेश कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक
  लोकसभा प्रवास अभियान आणि विधान परिषद
  फडणवीस,चंद्रकांत पाटील,तावडे राहणार उपस्थित

  19:27 (IST)

  शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येत
  शिवसेना नेते आणि कार्यकर्ते उपस्थित
  आदित्य ठाकरेंच्या हस्ते शरयू तीरावर आरती
  संजय राऊत, एकनाथ शिंदे आरतीला हजर
  शरयू नदीकाठावरून महाआरती LIVE

  19:14 (IST)

  जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार, अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद - अजित पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स