Live Updates: आर्यन खानची क्वारंटाईन सेलमधून सामान्य गुन्हेगारांच्या कारागृहात रवानगी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 14, 2021, 20:22 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना अटक आणि सुटका, 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन, अनंत करमुसे मारहाण प्रकरणी झाली होती अटक, ठाणे कोर्टाकडून जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर, ठाणे पोलीस आयुक्तांची माहिती

  22:7 (IST)

  मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचं निवेदन

  22:4 (IST)

  पुणे - कात्रजच्या दरी पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

  21:52 (IST)

  मुंबईच्या लोअर परळ परिसरातील घटना
  प्रेयसीसाठी प्रियकराचा मुलावर, पोलिसांवर हल्ला
  कोयत्यानं वार केल्याचा धक्कादायक प्रकार
  हल्ल्यात 17 वर्षांचा मुलगा आणि 2 पोलीस जखमी

  21:43 (IST)
  पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदमांसह पती, मुलगा आणि सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल
  20:17 (IST)

  अमित शाहांनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
  'फडणवीसांआधी महाराष्ट्रात भाजपचा सीएम नव्हता'
  देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले, निवडणुकीनंतर सीएमही - शाह

  20:2 (IST)

  'म्हाडाद्वारे अधिकाधिक परवडणारी घरं निर्माण करणार'
  'क्लस्टर योजनेत सिडको पालिकेप्रमाणेच म्हाडानंही यावं'
  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली अपेक्षा

  19:59 (IST)

  वरळीतील 3 रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ

  19:58 (IST)

  नवी मुंबई - मोरबे धरण भविष्यात कमी पडणार, खोपोलीतील पाण्यावर बंधारा बांधून नवी मुंबईला पाणी आणणार, भविष्यात इलेक्ट्रिक बसच्या खरेदीचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिकेत जाऊन आयुक्तांची घेतली भेट

  19:51 (IST)

  दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरूपी विद्युत रोषणाई, या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स