LIVE: पीयूष गोयल यांची राज्यसभा नेते म्हणून निवड

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 14, 2021, 15:20 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:19 (IST)

  अमरावती जिल्ह्यातील 8वी ते 12वीपर्यंतच्या शाळा उद्यापासून होणार सुरू, अमरावती जिल्ह्यातील एकूण 748 शाळांपैकी 337 शाळा उद्यापासून ऑफलाईन होणार सुरू - शिक्षणाधिकारी

  20:30 (IST)

  राज्यात दिवसभरात 6,067 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 8,602 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 170 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96.17 तर मृत्युदर 2.4 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 6,764 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:45 (IST)

  नागपूर-भंडारा महामार्गावरील सावळी गावाजवळची घटना, रस्त्यावर चालणाऱ्या वेड्या व्यक्तीनं दगड मारल्यानं एसटी बसला अपघात, चालकासह 12 प्रवासी जखमी

  19:25 (IST)

  'राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा नाही'
  प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा नाही - शरद पवार
  'निवडणूक लढवण्याबाबतची बातमी पूर्णपणे असत्य'
  'राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वांना माहीत'
  नाना पटोले विषयावर नाराज नाही - शरद पवार
  'कोणत्याही पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार'
  राज्यातल्या महामंडळ विषयावर चर्चा झाली - पवार
  95% महामंडळ वाटपावर सहमती - शरद पवार
  3-4 महामंडळ वाटपाबाबत चर्चा सुरू आहे - पवार

  19:15 (IST)

  'गणेशोत्सवासाठी कोकणात जादा बसेस सोडणार'
  'महामंडळाचा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय'
  16 जुलैपासून आरक्षण सुरू - अनिल परब

  19:3 (IST)

  पाणीपुरवठा योजना, नळजोडण्यांच्या कामांना गती द्यावी; अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा आढावा - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

  18:59 (IST)

  शाळांच्या फीवाढसंदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा
  कॅबिनेट बैठकीत फक्त चर्चा, निर्णय घेतला नाही
  खासगी शाळेत हस्तक्षेप नको, काही मंत्र्यांचा सूर - सूत्र
  राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या संबंधित खासगी शाळा
  शाळांच्या फीवाढीचा निर्णय तूर्तास घेतला नाही - सूत्र
  फीच्या निर्णयावरून काही मंत्र्यांचा वेगळा सूर?

  18:47 (IST)

  पुणे - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी घेतली भेट
  स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं केलं सांत्वन
  MPSC विद्यार्थ्यांबाबत सरकार उदासीन - दरेकर
  'सर्वच क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल करा'
  ...नाहीतर लोक उपासमारीनं मरतील - प्रवीण दरेकर
  राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - दरेकर
  कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे - प्रवीण दरेकर
  सरकारला खुर्ची वाचवण्यात रस - प्रवीण दरेकर

  18:6 (IST)

  डेल्टा प्लसचा नवा रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही, प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने तपासणी सुरू - राजेश टोपे

  18:1 (IST)

  विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
  2 डोस घेतले असतील तर महाराष्ट्रात थेट प्रवेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स