LIVE: अरुण गवळी पुन्हा जेलबाहेर, 4 आठवड्यांची फर्लो रजा मंजूर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 11, 2021, 20:04 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:46 (IST)

  मुंबईकरांसाठी लसीकरणाबाबत महत्वाची बातमी
  मुंबईत उद्या आणि परवा लसीकरण बंद राहणार
  शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद
  पुरेशा लससाठ्याअभावी 2 दिवस लसीकरण बंद

  21:42 (IST)

  'निर्बंधात शिथिलता असली तरी जबाबदारी वाढलीय'
  कोरोनाची त्रिसूत्री पाळणं आवश्यक - मुख्यमंत्री
  'यापुढे निर्बंधासाठी ऑक्सिजनचा निकष पाळणार'

  21:26 (IST)

  बाहेरच्या राज्यातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांना त्यांचे दोन्ही डोस आणि 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असल्यास राज्यात प्रवेश मिळणार, ज्यांचं लसीकरण पूर्ण झालं नसेल त्यांना आधीच्या नियमांनुसार RTPCR चाचणी आणि 14 दिवस क्वारंटाईन होणं बंधणकारक

  20:9 (IST)
  अरुण गवळीला 4 आठवड्यांची फर्लो रजा मंजूर
  19:49 (IST)

  राज्यात डेल्टा प्लसचा धोका आणखी वाढला
  राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 65 रुग्ण

  19:39 (IST)

  शाळांच्या फी कपातीचा निर्णय रखडला
  काही मंत्र्यांचा 15 टक्के फी कपातीला विरोध
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर मतभेद
  फी कपातीसंदर्भात उद्या अध्यादेश निघणार?

  18:54 (IST)

  राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय - नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदं लोकसेवा आयोगाच्या कक्षेत, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा करणार
  , अमरावती जिल्ह्यातील राजुरा लघुपाटबंधारे प्रकल्पास 193.81 कोटींची सुधारित मान्यता

  18:48 (IST)

  शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा चर्चा होणार - टोपे
  मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली - टोपे
  शाळा सुरू करण्याबाबत उद्या अंतिम निर्णय - टोपे

  18:48 (IST)

  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
  मॉल, हॉटेल 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
  मॉलमध्ये 2 डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार
  रेस्टॉरंट‌ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार
  रेस्टॉरंटमध्येही 50% बैठकव्यवस्था आवश्यक
  जिम रात्री 10 पर्यंत सुरू राहणार - राजेश टोपे
  15 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार - टोपे
  दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांनंतर लोकल प्रवास मुभा
  मासिक, त्रैमासिक पासेस देण्याच्या रेल्वेला सूचना
  खुल्या मंगल कार्यालयांमध्ये 200 लोकांची अट
  50 टक्के क्षमतेनं बंदिस्त हॉलमध्ये मुभा
  खासगी कार्यालयं 24 तास सुरू ठेवण्यास मुभा
  खासगी कार्यालयात एका शिफ्टला 50% हजेरीसक्ती
  सर्व दुकानं रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
  चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि धार्मिकस्थळं बंद
  इनडोअर क्रीडा प्रकाराला कॅबिनेटमध्ये मान्यता
  'अनलॉक'चे नियम सर्व जिल्ह्यांत लागू राहतील
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

  18:42 (IST)

  कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी निर्णय
  'अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण देणार'
  'नोकरी करणाऱ्या महिलांसाठी होस्टेल योजना'
  महिला-बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती
  'नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधणार'
  'केंद्रपुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवणार'
  नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक
  मुद्रांक निरीक्षक गट 'ब' लोकसेवा आयोगाच्या कक्षेत
  भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
  राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा करणार
  अमरावती जिल्ह्यातील राजुरा लघुपाटबंधारे प्रकल्प
  प्रकल्पाला 193.81 कोटींची सुधारित मान्यता
  राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स