LIVE: शिवसेनेची राज्यघटनेतील 127 व्या संदर्भात विधेयकातील दुरुस्ती फेटाळली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | August 10, 2021, 19:29 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:27 (IST)

    नाशिक - जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर, वाहनचालक ज्ञानेश्वर येवले, प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक, तिघेही ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    20:17 (IST)

    महाविकास आघाडीची राजकीय खेळी
    राजीव गांधींच्या नावानं देणार पुरस्कार
    महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण निर्णय
    माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थेसाठी पुरस्कार

    20:8 (IST)

    SEBC वर्ग ठरवण्याचे अधिकार आता राज्याला
    127वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर 
    दोन तृतीयांश बहुमतानं विधेयक पारित
    विधेयकाच्या बाजूनं 385, विरोधात शून्य मत
    उद्या राज्यसभेत विधेयकावर चर्चा होणार

    18:8 (IST)

    मुंबई - मासिक पासवर प्रवास करण्याची परवानगी
    रोजच्या प्रवासासाठी तिकीट दिलं जाणार नाही
    रेल्वे पासवर क्यूआर कोड आणि फोटो असणार
    योग्य कागदपत्रानंतर लोकलचा पास मिळणार
    ऑफलाईन पाससाठी स्थानकांवरील ऑफलाईन प्रणाली
    11 ऑगस्टपासून रोज स.7 ते रात्री 11पर्यंत कार्यान्वित

    18:6 (IST)

    राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार
    ग्रामीण भागात 5वी ते 8वी शाळा सुरू होणार
    शहरी भागात 8वी ते 12 वी शाळा सुरू होणार
    विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद

    17:40 (IST)

    ओबीसी जनमोर्चाच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; महाज्योती, वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी निधी देताना हात आखडता घेणार नाही, इतर मागास वर्गांचे प्रलंबित प्रश्न तातडीनं निकाली काढण्यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश - उद्धव ठाकरे

    17:34 (IST)

    'दुकानदारांप्रमाणे हॉटेलचालकांनाही मुभा मिळावी'
    हॉटेलचालकांच्या संघटनांची मागणी - अस्लम शेख
    हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यावर चर्चा - अस्लम शेख
    याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलीय - अस्लम शेख
    'हॉटेलचालक नाराज नाहीत, त्यांचं सरकारला सहकार्य'
    8 दिवसांत शिथिलतेवर निर्णय होईल - अस्लम शेख
    'मुंबईत टप्प्याटप्यानं सगळं सुरू करण्याचा प्रयत्न'

    17:10 (IST)

    ओबीसींच्या अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा - भुजबळ
    'ओबीसी जनगणना, इम्पिरिकल डाटावर चर्चा'
    केंद्रानं इम्पिरिकल डाटा द्यावा - छगन भुजबळ
    50% आरक्षण मर्यादा शिथिल करावी - भुजबळ

    16:28 (IST)

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महत्वाची बैठक
    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक
    ओबीसी परिस्थिती, लोकसंख्या मोजणीबाबत चर्चा?
    ओबीसी आयोगाच्या सद्यस्थितीवर बैठकीत चर्चा
    14 पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवरही चर्चा

    16:13 (IST)

    मंत्रालय परिसरातील दारूच्या बाटल्यांचं प्रकरण
    ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी शरमेची - फडणवीस
    सरकारनं तात्काळ चौकशी करावी - फडणवीस
    दोषींवर कठोर कारवाई करावी - देवेंद्र फडणवीस

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स