liveLIVE NOW

Live Updates: लातूरमध्ये 31 एसटी बसच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 09, 2021, 20:57 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 21 DAYS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:3 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
  'अनावश्यक कामांची उधळपट्टी थांबणार'
  'पाहणी करूनच कामाच्या निविदा काढा'
  नवी मुंबई मनपा आयुक्तांकडून आदेश

  21:46 (IST)

  पालघर जिल्ह्यासह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार - वर्षा गायकवाड

  21:46 (IST)

  राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांची माहिती

  20:37 (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाबाबत अल्प प्रतिसाद असल्यानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाणांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सी, रास्त भाव दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी ग्राहक आणि नागरिकांकडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा केल्या सूचना

  20:3 (IST)

  महाराष्ट्रात आरोग्य विभागाचं मोठं यश
  लसीकरणामध्ये ओलांडला 10 कोटींचा टप्पा
  मुंबईत दिवसभरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

  18:11 (IST)

  वानखेडे कुटुंबीयांनी घेतली राज्यपालांची भेट
  क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे राज्यपालांना भेटले
  समीर वानखेडेंवरील आरोपांसंदर्भात केली चर्चा

  17:48 (IST)

  मुख्यमंत्र्यांना काही दिवस पाठदुखीचा, मानदुखीचा त्रास
  उद्धव ठाकरेंना छोट्या शस्त्रक्रियेचा सुचवला पर्याय
  एचएन रिलायन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचा सल्ला
  शस्त्रक्रिया करायची की नाही, उद्धव ठाकरे निर्णय घेतील
  मुख्यमंत्र्यांवर घरगुती उपचार सुरू, तब्येतीत सुधारणा

  17:27 (IST)

  पाकिस्तानी गस्तीनौकेच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या मच्छीमार श्रीधर चामरेंच्या कुटुंबीयांना राज्य सरकार करणार 5 लाखांची मदत; 

  मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

  17:24 (IST)

  औरंगाबाद - समीर वानखेडेंच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी नवाब मलिकांविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली तक्रार, मलिकांच्या खोट्या आरोपामुळे कुटुंबाला होतोय त्रास, 

  आमच्या मुलीबाळींना सासरे मंडळी जातीवरून त्रास देत असल्याचा तक्रारीत आरोप, नवाब मलिकांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

  17:18 (IST)

  एसटी महामंडळाची राज्यभरात कारवाई
  45 आगारांतील 376 कर्मचारी निलंबित
  जीआरनंतरही संघटनांचा संप मागे नाही
  एसटी महामंडळाचा कारवाईचा बडगा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स