liveLIVE NOW

LIVE: मराठा आरक्षण मुद्दा उद्या संसदेत? भाजप खासदारांना व्हीप जारी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 09, 2021, 17:45 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:19 (IST)

  10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत जाहीर, 11 ते 18 ऑगस्ट नियमित शुल्क भरून तर 19 ते 25 ऑगस्ट विलंब शुल्क भरून; पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी आणि श्रेणी सुधार योजनेनुसार ज्यांना आणखी एकदा परीक्षा द्यायची इच्छा आहे त्यांना उपयोगी पडणार पुरवणी परीक्षा, राज्य मंडळानं पत्रक काढून जारी केलं वेळापत्रक

  20:24 (IST)

  रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी महत्वाची बैठक
  भाजपच्या लोकसभा, राज्यसभा खासदारांची बैठक
  महाराष्ट्रातील भाजपचे अनेक आमदारही उपस्थित
  चंद्रकांत पाटील, राम शिंदे, जयकुमार रावल उपस्थित
  संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, मनोज कोटक उपस्थित
  राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे उपस्थित
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही बैठकीत

  20:17 (IST)

  राज्यात कोरोना मृत्यू संख्येत कमालीची घट
  राज्यात दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 4 हजार 500 नवे रुग्ण

  19:52 (IST)

  टोकियो ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू मायदेशी परतले, दिल्ली विमानतळावर खेळाडूंचं जोरदार स्वागत; नीरज, दहिया, पुनियाचं ढोलताशे वाजवून स्वागत, ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचा सन्मान, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

  19:34 (IST)

  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 200 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू
  मुंबईच्या झोपडपट्टीमधून कोरोना हद्दपार?
  मुंबईत आता केवळ एक झोपडपट्टी सील

  19:29 (IST)

  मुंबईला बिल्डरमुक्त करण्याची मागणी
  'आत्मनिर्भर पूर्णविकास योजना राबवावी'
  केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांच्याकडे मागणी
  देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांकडून मागणी
  'स्वयं पूर्णविकास कर्ज योजना राबवावी'
  60 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करणार मागणी
  केंद्राला योजना राबवण्यासाठी करणार मागणी

  19:16 (IST)

  36,19,319 किमतीचा निकृष्ट दर्जाचा मध जप्त
  अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई
  वितरक, उत्पादकांविरोधात कारवाई होणार
  सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत कारवाई होणार

  18:14 (IST)

  'सीएमनी घोषणा केली ती यांना कळली नाही का?'
  'लोकल सुरूच, फक्त काही ट्रेन वाढवाव्या लागतील'
  'त्याला काही वेगळ्या रॉकेट सायन्सची गरज नाही'
  मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं वक्तव्य
  'योग्यवेळी पत्र मिळेल, उद्याच ट्रेन सुरू करायची नाही'
  पासचा अॅप बनवायला 24 तास लागतील - अस्लम शेख
  'कुणालाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ'
  राज्य सरकारची विनंती केंद्र सरकार ऐकेल - अस्लम शेख

  17:49 (IST)

  अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक
  संसद भवनातील कार्यालयात दीड तास चर्चा
  मुंबई महापालिका निवडणुकीवर बैठकीत चर्चा
  102 व्या घटना दुरुस्तीविषयक बैठकीत चर्चा
  राज्यातील संघटनात्मक बदलाबाबत प्राथमिक चर्चा

  17:25 (IST)

  'कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी देणार'
  केंद्राच्या वतीनं नितीन गडकरींनी दिलं आश्वासन
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिलं निवेदन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स